vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अभिनेता शाहरुख खान वर कस्टम अधिकाऱ्यांची कारवाई; महागडी घड्याळे बाळगल्याप्रकरणी ठोठावला 6.83 लाखांचा दंड

 अभिनेता शाहरुख खान वर कस्टम अधिकाऱ्यांची कारवाई; महागडी घड्याळे बाळगल्याप्रकरणी ठोठावला 6.83 लाखांचा दंड…

 

मुंबई प्रतिनिधी

शाहरुखकडे महागडे घड्याळ आणि कव्हर होते. ज्यासाठी त्याने कस्टम ड्युटी भरली नव्हती. चौकशी केल्यानंतर त्याला सुमारे सात लाख रुपयांचा दंड भरावा लागला.

शाहरुख खान  आणि त्याच्या टीमला कस्टम अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर थांबवले. विमानतळावर तैनात एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) च्या सूत्रांनी सांगितले की, शाहरुख शुक्रवारी रात्री शारजाहून परतला होता. एका कार्यक्रमानिमित्त तो यूएईला गेला होता. सुमारे तासाभराच्या चौकशीनंतर शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत बाहेर आला. शाहरुखकडे महागडे घड्याळ आणि कव्हर होते. ज्यासाठी त्याने कस्टम ड्युटी भरली नव्हती. चौकशी केल्यानंतर त्याला सुमारे सात लाख रुपयांचा दंड भरावा लागला. शाहरुख त्याच्या टीमसह दुबईमध्ये एका खासगी चार्टरद्वारे एका पुस्तक लाँच कार्यक्रमात पोहोचला होता. काल रात्री 12.30 वाजता ते मुंबईला परतले.

शाहरुख आणि त्याच्या टीमच्या बॅगमध्ये मौल्यवान घड्याळांची कव्हर सापडली. त्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी सर्वांची तपासणी केली. एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड स्टारकडे सुमारे 18 लाख रुपयांच्या महागड्या घड्याळांचे कव्हर होते. ज्यासाठी त्याला 6.83 लाख रुपये कस्टम ड्युटी भरावी लागली

सुमारे तासभर चौकशीची संपूर्ण प्रक्रिया चालली. यानंतर शाहरुख आणि पूजा ददलानी यांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यांचे अंगरक्षक रवी आणि इतर सदस्यांना थांबवण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे बिल शाहरुखच्या बॉडीगार्डच्या नावाने बनवण्यात आले आहे. मात्र, हे पैसे शाहरुखच्या क्रेडिट कार्डवरून दिल्याचे सूत्रांकडून समजते

 

संबंधित पोस्ट

आयआयटी दिल्ली  जामिया मिलिया, इंडियन मेडिकल असोसिएशन, नेहरू मेमोरिअल  म्युझियम अँड लायब्ररी यासारख्या देशभरातील तब्बल सहा हजारांपेक्षाही अधिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) परदेशातून मिळणाऱ्या निधीला ब्रेक ..

मोतीबिंदू मुक्त राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,विदर्भातील मास्टेक व शंकरा फाऊंडेशन, यूएसए संस्थाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात असभ्य टिप्पण्या करणाऱ्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र सायबर सेलकडून अटक

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकाऱ्यांसाठी सात कलमी कृती कार्यक्रम’सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर करावे’ – मुख्यमंत्री

17 लाख दिव्यांनी उजळणार श्रीरामाची अयोध्या; गुरू वशिष्ठच्या भूमिकेत पीएम मोदी करणार श्रीरामाचा राज्याभिषेक

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी, पूर परिस्थितीत; मदत व बचाव कार्यास सर्वोच्च प्राधान्य,जिल्हा प्रशासनास तातडीने मदत; साधनसामग्री उपलब्ध नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन

vishwatmaklokswamivarta