vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरामध्ये बिबट्याचा महिलावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत..गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरामध्ये बिबट्याचा महिलावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत..

गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरामध्ये बिबट्याचा महिलावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत..

 

मुंबई प्रतिनिधी

आरे कॉलनी परिसरामध्ये आदर्श नगर परिसरामध्ये संगीता गुरव या 38 वर्षीय महिला (11 नोव्हेंबर) काल आपल्या घरी जात असताना अचानक बिबट्याने हल्ला केला.

 

दीड वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची (Leopard Attack) बातमी ताजी असताना आता आरे कॉलनीमध्ये (Aarey Colney) अजून एक घटना समोर आली आहे. एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याचं समोर आलं आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या स्त्रीला सध्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या सकाळी युनिट नंबर 15 मध्ये आईसोबत दिवा लावण्यासाठी बाहेर आलेल्या दीड वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. नंतर रात्री देखील अन्य एका व्यक्तीवर हल्ला झाला होता. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. वनविभागाने लोकांच्या मागणीनुसार पिंजरे लावून त्याला जेरबंद केले. आता या विभागात अजून एक बिबट्या फिरत असल्याने वन विभाग त्याचा शोध घेत आहे.

आरे कॉलनी परिसरामध्ये आदर्श नगर परिसरामध्ये संगीता गुरव या 38 वर्षीय महिला (11 नोव्हेंबर) काल आपल्या घरी जात असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. यामध्ये त्या थोडक्यात बचावल्या. पण त्यांच्या डोक्याला, मानेला दुखापत झाली आहे. सध्या त्यांना ट्रॉमा केअर हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहे. वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

संबंधित पोस्ट

जिल्हास्तर युवा महोत्सव जल्लोषा संपत्र**जिल्हास्तर युवा महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर  कठोर कारवाई अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरून नष्ट करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुणासाठीआपले सरकार प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारणार..

सुशासन सप्ताहात ५३०१ लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ-९१ शिबीरांचे आयोजन ; ५८९ तक्रार अर्ज निकाली…

vishwatmaklokswamivarta

रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प,मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम…

vishwatmaklokswamivarta