vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणावर ‘लव्ह जिहाद’ चा संशय मुलीच्या वडिलांकडून व्यक्त; आफताब नराधमाला  मृत्यूदंड व्हावा याची मागणी…

श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणावर ‘लव्ह जिहाद’ चा संशय मुलीच्या वडिलांकडून व्यक्त; आफताब नराधमाला  मृत्यूदंड व्हावा याची मागणी…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

आफताबने श्रद्धा कडून त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचं सांगत खून केल्याचा जबाब दिला आहे.

दिल्ली (Delhi) मध्ये एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. महाराष्ट्रीयन श्रद्धा वालेकरचा  तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब  कडून अमानुष खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 6 महिन्यांनंतर या हत्याकांडाचा सुगावा लागल्यानंतर त्यामधील खुलासे अंगावर काटा आणणारा आहेत. मृत श्रद्धा वालेकर चे वडील यांनी आज (15 नोव्हेंबर) या घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना मुलीच्या हत्येमागे लव्ह जिहादचा  संशय व्यक्त केला आहे तर आफताबला मृत्यूदंड व्हावा अशी मागणी केली आहे.

 

ANI सोबत बोलताना श्रद्धाचे वडील विकास वालेकर यांनी ‘दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आमचा या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय आहे. पोलिस सध्या योग्य दिशेने तपास करत आहेत. श्रद्धा माझ्यापेक्षा तिच्या काकाशी अधिक जवळ होती. माझ्याशी तिचं फार बोलणं होत नव्हतं. मी कधीच आफताब सोबत संपर्कामध्ये नव्हतो. मी पहिली तक्रार मुंबईच्या वसई मध्ये केली आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, Aftab Poonawalla हा फूड ब्लॉगर होता. दिल्लीत तो कॉल सेंटर मध्येही काम करत होता. दिल्लीमध्ये तो Chhatarpur भागात भाड्याच्या घरामध्ये राहत होता हा त्याच्या हत्येच्या कटाचा भाग होता का? याचा तपास आता पोलिस करत आहेत. त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार आता त्यांच्याकडून Bumble शी संपर्क साधून आफताब शी संपर्कात असलेल्या मुली कोणकोण होत्या याची प्रोफाईल वरून माहिती घेण्याचा प्रयत्न असेल. श्रद्धाचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवण्यात आला होता. त्यावेळी कोणत्या मुलींना तो भेटला आणि त्यांच्यापैकी कुणी या हत्येशी निगडीत आहे का? याचा देखील तपास केला जाणार आहे.

 

श्रद्धाचा मृत्यू 18 मे दिवशी झाला आहे. मृत्यू पूर्वी काही दिवस आधीच हा फ्लॅट भाड्याने घेण्यात आला होता. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट होता का? याकडेही लक्ष दिले जाणार आहे. आफताबचे कुटुंबिय देखील मुंबई मध्ये राहत होते. त्याचा फूड ब्लॉगचा व्हिडिओ देखील फेब्रुवारी महिन्यात शेवटचा पोस्ट झालेला आहे. त्याच्या इंस्टा प्रोफाईल वर 28 हजार फॉलोवर्स आहेत.

श्रद्धाच्या मैत्रिणीकडून तिच्याशी काहीही कॉन्टॅक्ट न झाल्याचं समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने मुंबईत श्रद्धाच्या वडिलांकडून तक्रार नोंदवण्यात आली. दिल्ली पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतलं असून त्याने खूनाची कबुली दिली आहे. आज त्याला घेऊन पोलिसांनी जेथे श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकले गेले आहेत तेथे जाऊन तपास करण्यास सुरूवात झाली आहे.

 

 

 

 

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्राला दौऱ्यावर,शिर्डी दर्शन, निळवंडे धरणाचे जलपूजन, 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !*सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची तयारी पूर्ण : उत्कंठा शिगेला !**गोमंतकात प्रथमच भरणार हजारो भक्तांचा कुंभमेळा !२३ देशांतील प्रतिनिधी २५ हजार भाविक  १५ पावन संतपादुका  सोमनाथ ज्योतिर्लिंग  ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन • देव, देश व धर्म जागृतीचा संदेश!

फाशीचा वड असणाऱ्या ठिकाणला राज्य स्मारक करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार…

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयामार्फत 29 जुलै ते 3 ऑगस्ट 2024 कालावधीत विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन – सचिव न्या. ईश्वर सुर्यवंशी

विधानपरिषद प्रश्नोत्तरे :विद्यापीठांचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी समिती नियुक्त- मंत्री चंद्रकांतदादा पाटील..

vishwatmaklokswamivarta

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.२० रोजी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटनजिल्ह्यातील ३३ महाविद्यालयांचा समावेश

vishwatmaklokswamivarta