vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सेनेचे खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी!

:शिवसेनेचे खासदार  संजय राऊतांचा जामीन रद्द होणार? ईडीच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी!

मुंबई प्रतिनिधी

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडी पूर्ण प्रयत्न करणार आहे. राऊत यांच्याविरोधात पुरावे असूनही सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता उच्च न्यायालय नेमका काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

 

संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटक थेट बेकायदेशीर ठरवत पीएमएलए कोर्टानं ईडीला धक्का दिला होता. यामुळे ईडीच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला होता आणि संजय राऊत १०० दिवसांनी तुरुंगाबाहेर आले.

संजय राऊत यांच्या जामीन प्रकरणावर सुनावणी घेताना विशेष सत्र न्यायालयाने ईडीला झापलं होतं. पत्राचाळ प्रकरणी दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. दिवाणी खटले हे मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून त्यांना अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही, असं कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं होतं.

 

संबंधित पोस्ट

अमरावती येथील श्री सोमेश्वर संस्थानाची 50 कोटींची जमीन 960 रुपयांना विकली !मंदिरांच्या जमिनी लाटणार्‍या तहसिलदारांसह सर्व दोषींना त्वरित अटक करा ! – ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना दिल्या दिवाळीच्या खास शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार जागीच मृत्यू दोन अज्ञात इसमांना अटक एक फरार

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन : अभ्यागतांसाठी सूचना व भित्तिपत्रकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

लोकसभा निवडणूक २०२४ – चौथा टप्पा: ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान..

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला प्रत्युत्तर देणार?…

vishwatmaklokswamivarta