vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईत 29-30 नोव्हेंबर दरम्यान 10 वॉर्ड्स मध्ये 24 तास पाणी कपात; अंधेरी मध्ये प्रामुख्याने जाणवणार प्रभाव

मुंबईत 29-30 नोव्हेंबर दरम्यान 10 वॉर्ड्स मध्ये 24 तास पाणी कपात; अंधेरी मध्ये प्रामुख्याने जाणवणार प्रभाव…

मुंबई प्रतिनिधी

मुंबईत (Mumbai) बीएमसी (BMC) कडून 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 24 तास पाणी कपातीची (Water Cut) घोषणा जारी करण्यात आली आहे.

मुंबईत (Mumbai) बीएमसी (BMC) कडून 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 24 तास पाणी कपातीची (Water Cut) घोषणा जारी करण्यात आली आहे. या 24 तासांमध्ये 10 वॉर्ड्समध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. के पूर्व (K East) आणि के पश्चिम (K West) या दोन भागांमध्ये अधिक पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

के पूर्व प्रभागात अंधेरी पूर्व, एमआयडीसी, सीप्झ, जोगेश्वरी पूर्व आणि इतर उपनगरातील प्रमुख भागांचा समावेश आहे. गुंदवली, नेहरू नगर आणि आझाद नगर या भागात 29 नोव्हेंबरला पाणीपुरवठ्यात कपात होईल. तर आनंद नगर, समर्थ नगर आणि शेर-ए-पंजाब भागात 30 नोव्हेंबरला पाणीपुरवठ्यात कपात होणार आहे. उर्वरित भागात मात्र पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होईल. असे सांगण्यात आले आहे.

के पश्चिम वॉर्डात राहणार्‍या सुमारे 7.5 लाख लोकांना 24 तासांच्या पाणीकपातीचा फटका बसेल असा अंदाज आहे. ओशिवरा, लोखंडवाला, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि जुहू या मेट्रो भागांना 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. तसेच के पश्चिम प्रभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान म्हणाले की, पाणीपुरवठा कपातीच्या काळात कूपर रुग्णालयाला पाणी देण्यासाठी बीएमसीचे टँकर वापरले जातील.

संबंधित पोस्ट

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत बैठक…

विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी…

vishwatmaklokswamivarta

पाऊस ओसरताच पंचनामे तात्काळ पूर्ण करा**अतिवृष्टीबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या**- पालकमंत्री शंभूराज देसाई*

पुणे जिल्ह्यातील मावळ  तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू. ३२ जण जखमी, बचावकार्य सुरु, दुर्घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख.

संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी समाजाचे ‘रोल मॉडेल’ व्हावे-अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय मनाला गहिवर आणणारा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· ८६२ अनाथ युवक-युवती स्वावलंबीमुख्यमंत्र्यांनी अनाथ युवक युवतींशी वर्षा निवासस्थानी साधला संवाद..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस.

vishwatmaklokswamivarta