vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी…

 विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी…

 

मुंबई, प्रतिनिधी : छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानसभा सदस्य अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केली.

दोन्ही सभागृहात निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो. विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यासारखी माणसं शरीराने भारतात राहतात. त्यांना देशाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी कसलेही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. अशांची भलामण करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आपला इतिहास शौर्याचा आहे. पराक्रमाचा आहे. नऊ वर्षात 696 लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते. ते उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा असे त्यांनी सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

दार्जिलिंग परिसरातल्या पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन आणि दार्जिलिंगमधील पूल दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त…

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीर येथील येथे झालेल्या हल्ल्याबाबत….

एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित – मंत्री प्रताप सरनाईक व्यावहारिक मराठी येत नसलेल्या १ हजार २६८ चालकांना नोटीस ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नांदेड जिल्हा कारागृहातील महिला बंदींच्या अडचणी जाणून घेतल्या

बम बम भोलेनाथ बाबा अमरनाथ यात्रेची नोंदणी येत्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

संरक्षणमंत्र्यांनी नाशिकमध्ये एचएएलच्या स्मार्ट टाऊनशिपचे केले अनावरण

vishwatmaklokswamivarta