
गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सह अनेक व्हीआयपी केले मतदान…
गुजरात प्रतिनिधी: टप्प्यातील मतदान सुरु आहे. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार असून 833 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप आणि ‘आप’प्रमाणेच काही प्रादेशिक पक्षही स्वतःचं भवितव्य आजमावत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि आणि अल्पेश ठाकोर यांच्या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष असेल.
‘या’ मतदारसंघासाठी मतदान
दुसऱ्या टप्प्यात अहमदाबाद, गांधीनगर, मेहसाणा, पाटण, बनासकांठा, साबरकांठा, अरवली, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा, आनंद, खेडा आणि छोटा उदयपूर जिल्ह्यातील 93 जागांवर मतदान होणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात घाटलोडिया, विरमगाम आणि गांधीनगर दक्षिण या जागा सर्वाधिक चर्चेत आहेत.
पहिला टप्प्यात किती टक्के मतदान?
याआधी 1 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते आणि सुमारे 63.31 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत आणि 1 डिसेंबर रोजी सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील 89 जागांसाठी मतदान झाले.



