vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास,हीराबेन मोदी पंचत्त्वात विलीन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला मुखाग्नी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास,हीराबेन मोदी पंचत्त्वात विलीन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला मुखाग्नी…

 

गुजरात प्रतिनिधी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी आज पहाटे साडेतीनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला आहे. 2 दिवसांपूर्वीच हीराबेन यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे अहमदाबादच्या यू एन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचेही हॉस्पिटल कडून हेल्थ बुलेटीन जारी करत सांगण्यात आले होते.पण पुन्हा प्रकृती ढासळल्याने त्यांचे आज पहाटे रूग्णालयातच निधन झाले आहे. मातृशोकाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका ट्वीट द्वारा दिली आहे

हीराबेन मोदी यांच्यावर आज थोड्याच वेळात गुजरातच्या गांधीनगर मध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहे. मोदींचे कुटुंबीय सध्या घरीच आहे. त्यांची भेट घेण्यासाठी काही मंडळी पोहचत आहेत.

हीराबेन मोदी यांचं निधन हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर मोदी कुटुंबांकडून त्यांना अंतिम निरोप देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरून आज त्यांच्या आईचं मायेचं छत्र हरपलं आहे. पहाटे 3.30 च्या सुमारास त्यांचं निधन झाल्यानंतर लगेजच गांधीनगर मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हीराबेन मोदी यांचे पार्थिव काही काळ त्यांच्या घरी ठेवण्यात आल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः त्यांच्या पार्थिवाला खांदा देत अंत्यसंस्कारांना सुरूवात केली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे आज सकाळी निधन झाल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार तातडीने पार पडले आहेत. गांधीनगर मध्ये स्मशानभूमीत शेवटचे काही विधी पार पाडत त्यांनी मुखाग्नी दिला आहे. हीराबेन या 100 वर्षांच्या होत्या. 2 दिवसांपूर्वी त्यांना वृद्धापकाळामुळे होत असलेला काही त्रास पाहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण त्यामध्येच त्यांचे निधन झाले

संबंधित पोस्ट

नवीन वर्षाच्या निमित्ताने वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ..

vishwatmaklokswamivarta

इंदोर बस अपघातात प्राण गमावलेल्यांसोबत माझ्या संवेदना, मदत व बचाव कार्य सुरु आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेस माजी अध्यक्ष सोनिया गांधीं यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर केली ‘Poor Lady’ विवादित टिपण्णी; बिहारमध्ये खटला दाखल

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीतिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना देणार भेट

मुंबईतील  लालबाग परिसरात शिवसेनेने  छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना आणि कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन केले

vishwatmaklokswamivarta