
हरियाणा मधील धक्कादायक बातमी, दिवसाढवळ्या कारमध्ये शिरत महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कॅमेरात कैद..
हरियाणा प्रतिनिधी
हरियाणा मधून धक्कादायक बातमी समोर येत आहे एक महिला यमुनानगर परिसरात राहणारी नेहमीप्रमाणे महिला जीमवरुन परत येत असताना ती आपल्या कारमध्ये बसुन घरी येण्यास निघाली. तोच चार अज्ञातांनी महिलेच्या कारमध्ये शिरुन तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला
हरियाणा मधील यमुना नगर परिसरातील धक्कादायक बातमीने पूर्ण हरियाणा प्रदेश भीतीचे वातावरण पसरले आहे अशी चर्चा परिसरात सुरू आहे त्याचे हे एक उदाहरण
महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येवून ठेपला आहे. भरदिवसा हरियाणाच्या यमुना नगर या वर्दळीच्या परिसरातून महिलेचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. तरी ही महिला जीमवरुन परत येत असताना ती आपल्या कारमध्ये बसुन घरी येण्यास निघाली. तोच चार अज्ञातांनी महिलेच्या कारमध्ये शिरुन तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला पण महिलेच्या सतर्कतेमुळे हे अपहरण करते त्यांच्या योजनेत यशस्वी होवू शकले नाही. तरी या अपहरणा संबंधीत तक्रार दाखल केली असुन यमुना नगर पोलिस या घटनेचा सखोल तपास करत असल्याची माहिती डिएसपी कमलदीप सिंह यांनी दिली आहे.
अशी ही बातमी ए एन आय या वृत्त एजन्सीने दिलेली आहे



