vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आज २०२३ या नव्या वर्षाचा पहिला दिवस. मुंबईकरांकडून नव्या वर्षाचं धुमधडाक्यात स्वागत,मात्रमुंबई लोकलचा मेगाब्लॉक, रेल्वे प्रशासनाकडून सुधारित वेळापत्रक जारी..

 मुंबई लोकलचा मेगाब्लॉक, रेल्वे प्रशासनाकडून सुधारित वेळापत्रक जारी..

 

मुंबई प्रतिनिधी

वर्षाच्या पहिल्याचं दिवशी मुंबईकरांची जिवनवाहीनी सुट्टीवर गेली आहे. म्हणजे मुंबई लोकल रेल्वे प्रशासनाकडून आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

 

आज २०२३ या नव्या वर्षाचा पहिला दिवस. मुंबईकरांकडून नव्या वर्षाचं धुमधडाक्यात स्वागत करण्यात आलं. पण वर्षाच्या पहिल्याचं दिवशी मुंबईकरांची जिवनवाहीनी सुट्टीवर गेली आहे. म्हणजे मुंबई लोकल रेल्वे प्रशासनाकडून आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. लोकल ट्रेन आणि मार्गाच्या देखभालीच्या कामासाठी दर रविवारीचं मुंबई लोकल प्रशासनाकडून हा मेगाब्लॉक घेण्यात येतो. पण आजचा मेगाब्लॉक विशेष अडचण निर्माण करणारा आहे कारण आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि याचं पार्श्वभुमिवर मुंबईकर नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करण्यास मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. शहरातील मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, राणीची बाग, गिरगाव बिच, जूहू बिच अशा विविध ठिकाणांवर मोठी गर्दी करतात. मुंबईच्या विविध भागांसह मुंबई उपनगरातून शहरात दाखल होणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. तरी रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांना वाहतुकीत अडचण येणार असल्याची शक्यता आहे.

तरी तुम्ही नवीन वर्षाच्या मुहूर्तावर घराबाहेर पडण्याचं नियोजन करत असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबई लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. म्हणजे कल्याण, डोंबिवली, बलापूर, कसारा, ठाणे आणि नवी मुंबई या उपनगरातून मुंबई शहरात येणाऱ्या नागरिकांना मेगाब्लॉकचा फटका बसण्याची शक्यता आहे. तरी मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेकडून आज लोकल प्रवासाचं सुधारीत वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे

 

संबंधित पोस्ट

नमुंमपा निवडणूकीत प्रथमत:च बहुसदस्यीय पध्दतीने मतदान होत असल्याने विविध स्वरूपात जनजागृती 

vishwatmaklokswamivarta

पिंपरी-चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र तसेच दिवाणी न्यायालयाची स्थापना

धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी पं.दिनदयाल उपाध्याय योजनेचा लाभ घेण्याच्या योजनेस मुदतवाढ

प्रियदर्शनी कॉलनीत सिमेंट रोड चे भूमिपूजन प्रभागाचा विकास जनतेच्या विश्वासातून – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर  होणार

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजना ज्येष्ठ कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन..