vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्रात 29 जानेवारीनंतर येणार थंडीची लाट; तापमानात नोंदवली जाईल लक्षणीय घट

 महाराष्ट्रात 29 जानेवारीनंतर येणार थंडीची लाट; तापमानात नोंदवली जाईल लक्षणीय घट…

 

मुंबई प्रतिनिधी

आयएमडी पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, 30 जानेवारीपासून तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाईल. .

नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासूनच महाराष्ट्रात थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी तर तापमान 10 अंश सेल्सिअसच्या काही गेले होते. गेल्या काही दिवसांत थंडी कमी झाली असली तरी, लवकरच राज्यातील अनेक भागात पुन्हा थंडी पडू शकते. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे युनिटनुसार, 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. ही लाट 2 फेब्रुवारीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे

यादरम्यान अनेक भागात कडाक्याची थंडी पडेल आणि तापमानातही मोठ्या प्रमाणात घट नोंदवली जाईल. सध्या मुंबई आणि पुण्यातील तापमान 15 ते 16 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असून, येत्या काही दिवसांत त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. आयएमडी पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, 30 जानेवारीपासून तापमानात लक्षणीय घट नोंदवली जाईल

 

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अफगाणिस्तानवर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे जो पूर्वेकडे सरकत आहे. त्याच्या प्रभावामुळे दक्षिण-पश्चिम राजस्थानवर चक्रीवादळाचे वारे वाहत आहेत. याशिवाय 27 जानेवारीला आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे आकाश ढगाळ राहील व कमाल तापमानात घसरण होईल, पण किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

 

संबंधित पोस्ट

मारवाडी गल्लीतील रस्त्याची डागडूजी : नागरिकांत आनंदशिवसेना शहरप्रमुख दुर्गेेश काठोठीवाले यांच्या मागणीला यश..

शेतकरी आणि शेती समृद्ध करण्यासाठी ठोस आणि सर्वसमावेशक उपाययोजना – मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न,खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी  –जिल्हाधिकारी किशन जावळे

मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये चढल्यानंतर प्रवाशांच्या धक्क्यामुळे चालत्या लोकल ट्रेनमधून पडलेल्या महिला आणि तिच्या मुलाचे प्राण आरपीएफ (रेल्वे संरक्षण दल) च्या गुन्हे शाखेच्या दोन जवानांनी वाचवले.

vishwatmaklokswamivarta

भारतीय निवडणूक आयोगाकडून आज दुपारी 3 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार