
राजस्थान, मध्य प्रदेशात दोन मोठे अपघात; सुखोई-30 आणि मिराज 2000 सह 3 विमानांना अपघात…
विशेष प्रतिनिधी
राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले. पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात विमानाचे तुकडे झाले आहेत. या अपघातानंतर विमानाला आग लागली.
: राजस्थान आणि मध्य प्रदेशात दोन मोठे विमान अपघात झाले आहेत. भारतीय वायुसेनेची दोन चार्टर्ड विमाने मध्यप्रदेशच्या मुरैना येथे आणि एक चार्टर्ड विमान राजस्थानच्या भरतपूरमध्ये कोसळले. राजस्थानच्या भरतपूरमध्ये वायुसेनेचं विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले. पिंगोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात विमानाचे तुकडे झाले आहेत. या अपघातानंतर विमानाला आग लागली.
या अपघातात विमानांचा चक्काचूर झाला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फायटर जेटने आग्रा येथून उड्डाण केले. भरतपूरचे डीएम आलोक रंजन यांनी सांगितले की, भरतपूरजवळ चार्टर्ड विमान कोसळले आहे. पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.



