vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

इंडिगो विमानात आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; एका प्रवाशावर गुन्हा दाखल, मोठी दुर्घटना टळली…

 इंडिगो विमानात आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; एका प्रवाशावर गुन्हा दाखल, मोठी दुर्घटना टळली…

 

मुंबई प्रतिनिधी

नागपूर ते मुंबई विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाने चक्क आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक प्रकार एअर इंडिगो विमानात घडली. मात्र, वैमानिक आणि सहवैमानिक सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. प्रवाशांविरोधात इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोचे हे विमान मुंबईकडे २४ जानेवारी सकाळी ११.०५ वाजता रवाना झाले हे विमान मुंबई विमानतळावर १२.३० च्या सुमारास उतरत असतानाच एका प्रवाशाने विमानाचे आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. विमान हवेत असताना असा दरवाजा उघडल्यास प्रवासी आणि विमान दुर्घटना होण्याची भीती असते.

 

विमानातील वैमानिक आणि सहवैमानिक यांना हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्वरित त्या प्रवाशाला वेळीच सूचना दिल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती इंडिगो विमान कंपनीने दिली आहे. प्रणव राऊत असे या प्रवाशाचे नाव असून त्याच्याविरोधात इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भांदवि ३३६ तसेच एअरक्राफ्ट कायदा १९३७ अनुसार विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आला आहेत.

संबंधित पोस्ट

राज्यांमध्ये अलर्ट, चक्रीवादळ, 144 गाड्या रद्द; किनारपट्टीवर ताशी 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता…

vishwatmaklokswamivarta

मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी· सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वविजेतेपद पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघाचे अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

vishwatmaklokswamivarta

मुंबई-गोवा महामार्गा वर टोळक यांचा हैदोस लक्झरी प्रवाशांचे सोने लुटले…

वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेह.भ.प. मारुती महाराज कुरेकर यांचा ९३ वा आणि ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचा ७० वा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta