vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईच्या रस्त्यांवर 21 फेब्रुवारी पासून धावणार पहिली डबल डेकर बस..

मुंबईच्या रस्त्यांवर 21 फेब्रुवारी पासून धावणार पहिली डबल डेकर बस..

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईची शान असणारी डबल डेकर बस आता नव्या रूपात पुन्हा नागरिकांच्या भेटीला येणार आहे. आता ही डबल डेकर बस एसी आणि इलेक्ट्रिक झाली आहे. भारतातील पहिली एसी डबलडेकर बस  मुंबई  मध्ये 21 फेब्रुवारी पासून धावणार आहे.  कडून ही बस चालवली जाणार आहे.

 

मुंबईची शान असणारी डबल डेकर बस आता नव्या रूपात पुन्हा नागरिकांच्या भेटीला येणार आहे. आता ही डबल डेकर बस एसी आणि इलेक्ट्रिक झाली आहे. भारतातील पहिली एसी डबलडेकर बस  मुंबई  मध्ये 21 फेब्रुवारी पासून धावणार आहे. BEST कडून ही बस चालवली जाणार आहे. दरम्यान सध्या ही बस सीएसएमटी स्टेशन  ते एनसीपीए  या मार्गावर चालवली जाणार आहे. सकाळी 8.45 ते रात्री 10.30 या वेळेत ही बस धावणार आहे. या बससाठी रूट नंबर 115 असणार आहे. या एसी डबलडेकर बसचं  भाडं देखील सामान्यांच्या आवाक्यातील आहे. प्रति किमी केवळ 6 रूपये आकारले जाणार आहेत. मुंबईच्या रस्त्यावर अशा 200 बस उतरवण्याचा मानस आहे

 स्वच्छ भारत अंतर्गत या बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. 14 फेब्रुवारीला या बसच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बसद्वारा मुंबईकरांना वर्ल्ड क्लास ट्रॅव्हलचा अनुभव मिळणार असल्याचं म्हटलं आहे.

बेस्टच्या या नव्या डबल डेकर एसी बस इलेक्ट्रिक परिपूर्ण बस  आहेत. . सोबतच लिक्विड कुलिंग वापरण्यात आले आहे. यामधील बॅटरी दीड तास ते 3 तासाच्या कालावधीमध्ये चार्ज होईल. तर एकदा चार्ज केलेल्या बॅटरी वर बस 250 किमी प्रवास करू शकणार आहे.

बेस्टची ही अत्याधुनिक सुविधा सहित रायगड मधील पाताळगंगा मध्ये बनवण्यात आली आहे. या बस मध्ये काही अ‍ॅडव्हान्स फीचर्स आहेत ज्यामध्ये डिजिटल तिकीटिंग, सीसीटीव्ही कॅमेरा, लाईव्ह ट्रॅकिंग़, डिजिटल डिस्प्ले, पॅनिक बटण असणार आहे. या बसमध्ये 65 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. तर उभ्याने प्रवास करणार्‍यांची संख्या पहिली तर एकूण 100 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकणार आहेत.

 

संबंधित पोस्ट

मतदार जनजागृतीसाठी हॉट एअर बलुन राईड…

vishwatmaklokswamivarta

सर्व जिल्ह्यांमध्ये बालभवनसारखे केंद्र उभारण्याचा प्रयत्न -शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

vishwatmaklokswamivarta

मुंबई ते गोवा रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) बोट सेवा सुरु करण्याची योजना आखत आहे. खुद्य मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभाग मंत्री नितेश राणे यांनी याबाबतची घोषणा केली. 

हर घर तिरंगा मोहिमेला राज्यातील जनतेचा उत्सफूर्त प्रतिसाद

मुंबई गोवा महामार्ग रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येकडे 17 वर्षापासून दुर्लक्ष करणाऱ्या शासन आणि राजकारण्यांच्या विरोधात कोकणकरांचे बेमुदत 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा*

vishwatmaklokswamivarta