vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईतील चेंबूर परिसरात: गायक सोनू निगम याला मारहाण..

मुंबईतील चेंबूर परिसरात: गायक सोनू निगम याला मारहाण…. करणारे लोक उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराचा मुलगा आणि त्याचे अंगरक्षक असल्याचा दावा केला जात आहे.

मुंबई प्रतिनिधी

गायक सोनू निगम  आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना चेंबूर  येथे एका कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेत गायक सोनू निगम यास मुक्कामार लागला आणि किरकोळ दुखापत झाली. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

 

गायक सोनू निगम  आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना चेंबूर  येथे एका कार्यक्रमादरम्यान सोमवारी  धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेत गायक सोनू निगम यास मुक्कामार  लागला आणि किरकोळ दुखापत झाली. सध्या त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. चेबूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, गुन्हाही दाखल केलाआहे. हा प्रकार एका संगीत कार्यक्रमात सेल्फी घेण्यावरुन घडला.

घडल्या प्रकाराचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. निगम याला मारहाण करणारे लोक उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराचा मुलगा आणि त्याचे अंगरक्षक असल्याचा दावा केला जात आहे.

गायक सोनू निगमच्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहीता कलम 323 , 341, आणि 337 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. डीसीपी हेमराजसिंग राजपूत यांनी पत्रकारांना सांगितले की, “लाइव्ह कॉन्सर्टनंतर सोनू निगम स्टेजवरून खाली येत असताना एका व्यक्तीने त्याला पकडले. यावर सोनूने आक्षेप घेतल्यानंतर त्या व्यक्तीने सोनू निगम आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन व्यक्तींना पायऱ्यांवरून ढकलले, त्या दोघांपैकी एक जण जखमी झाला. आरोपीचे नाव स्वप्नील फातर्पेकर आहे.

मुंबई येथील चेंबूर येथे सोमवारी एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास गायक सोनू निगम हा देखील उपस्थित होता. कार्यक्रम संपला आणि व्यासपीठावरील सर्व कलाकार (सोनू निगम याच्यासह) खाली उतरत होते. दरम्यान, पायऱ्यांवरुन उतरत असलेल्या सोनू निगम याच्यावर अचानक हल्ला झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळते की , व्यासपीठावर जाण्यासाठी केलेल्या शिडीवरुन सोनू निगम खाली कोसळत आहे. काही बॉडिगार्ड आणि उपस्थित लोक त्याचा बचाव करण्यासाठी धावतानाही दिसत आहेत.

संबंधित पोस्ट

२४ ते ३० जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !श्रीराम मंदिरानंतर आता ‘हिंदु राष्ट्रा’साठी संघटित प्रयत्न आवश्यक! – सतीश कोचरेकर, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समितीमुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील ३५ विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे एकूण ७५ प्रतिनिधी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त सहभागी होणार !

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी-प्रवेशिका पाठविण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

मी सॅम डिसुझा नाही, माझ्या प्रोफाईचा चुकीचा वापर, पालघर पोलिसांत प्रभाकर साईलविरोधात तक्रार दाखल…

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मतदानासाठी 7 मे रोजी कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी