vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी-

गुरु तेग बहादुर यांच्या हौतात्म्याच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुमत समागम कार्यक्रम प्रसंगी बोलताना सांगितले.गोरेगाव, नेस्को येथील गुरुमत समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी गुरुमत समागम कार्यक्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले “गुरु तेग बहादुरजींनी देश, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या त्यागामुळेच आपण आज आपल्या परंपरा आणि संस्कृती जपू शकतो.” त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे विचार पुढे नेणे गरजेचे आहे. गुरु तेग बहादुरजी यांच्या बलिदानाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये त्याग, निःस्वार्थ सेवा आणि धर्मनिष्ठा यांचे महत्त्व अधोरेखित होईल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गुरु गोविंद सिंगजी यांनी देखील धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी महान कार्य केले. उत्तरेत गुरुजनांनी संरक्षण केले, तर दक्षिणेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी लढा दिला, असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

संबंधित पोस्ट

राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त ‘जिजाऊ गाथा महोत्सव’;महोत्सवाचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी यांचे आवाहन

नागरिकांनी “एक गाव एक गणपती”संकल्पनेनुसार शांतता व सौहार्दपूर्ण  वातावरणात उत्सव साजरा करावा” _पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड

भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट यात्रेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ जालना शहरात भव्य महिला रॅली,महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – शुभांगी देशपांडे

किशोरवयीन मुलांच्या व्यसन परावृत्तीसाठीज्ञानप्रबोधिनी देणार जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण..- प्रबोधनाचे मॉड्युल यशस्वी करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश- नोव्हेंबर महिन्यातील चार रविवारी चालणार प्रशिक्षण सत्र

vishwatmaklokswamivarta

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत १ जून सायंकाळपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी अंतिम यादीपूर्वी प्रक्रियेतील प्रत्येक तक्रार दूर करणार -शालेय शिक्षण विभाग