vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

एसी डबलडेकर बसला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद..

 एसी डबलडेकर बसला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद..

मुंबई प्रतिनिधी: मुंबईकरांच्या सेवेत कालपासून इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस दाखल झाली. आणि पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी या बसला तुफान प्रतिसाद दिला आहे. एक हजारांपेक्षा जास्त मुंबईकरांनी या डबलडेकर बसमधून प्रवास केला आहे. ए-115 क्रमांकाची ही बस सोमवार ते शुक्रवारमध्ये दररोज सीएसएमटी ते नरिमन पॉईंटपर्यंत अर्धा तासांच्या अंतराने धावणार आहे. तर शनिवार तसंच रविवारी हेरिटेज टूर म्हणून सेवा देणार आहे. तेव्हा हेरिटेज टूरलाही मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

 

मुंबईत चांगलाच उकाडा वाढला आहे. त्यातच बेस्ट ताफ्यात एसीबस दाखल झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत डबल डेकरने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना गारेगार प्रवास करता येत आहे. काल सीएसएमटीहून सकाळी पावणे नऊला पहिली बस सुटली. प्रवाशांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत. एकूण 200 बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत.

 

सध्या ही बस सीएसएमटी स्टेशन (CSMT Station) ते एनसीपीए (NCPA) या मार्गावर चालवली जाणार आहे. सकाळी 8.45 ते रात्री 10.30 या वेळेत ही बस धावणार आहे. या बससाठी मार्ग नंबर 115 असणार आहे. या एसी डबलडेकर बसचे (AC Double Decker Bus) भाडे देखील सामान्यांच्या आवाक्यातील आहे.

 

पहिल्या टप्प्यात बेस्टच्या ताफ्यात 7 वातानुकूलित इलेक्ट्रीक बसेस आहेत. एकूण 65 आसनव्यवस्था असलेली ही डबल डेकर बस आहे. सध्या दोनच बस मुंबईकरांच्या सेवेत येणार असून पुढच्या आठवड्यापर्यंत आणखी 7 ते 8 बस सेवेत येतील. तसंच मार्चअखेर 200 एसी इलेक्ट्रीक डबलडेकर बेस्टच्या ताफ्यात समाविष्ठ होतील. या बसचं तिकिट सर्वसामान्यांना परवडेल असं आहे. या वातानुकुलित बसचं कमीतकमी तिकिट 6 रुपये आहे. स्मार्ट कार्ड च्या माध्यमातून देखील तिकीट काढता येणार आहे.

संबंधित पोस्ट

जन धन खातेधारकांसाठी ई-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांचीअंमलबजावणीसाठी बँक आपल्या गावात..

वज्रेश्वरी महोत्सव – विभागीय, जिल्हास्तरीय व मिनी सरस विक्री प्रदर्शन”चे उद्घाटन कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आज संपन्न.

३५ गोशाळांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण

कराड व कोयनानगर येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

राज्यपालांचे श्रीचक्रधर स्वामी यांना अभिवादन

जे. जे. समूह रुग्णालयाच्या इमारत दुरुस्ती कामाचा पूर्ण मोबदला देणार-सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण