vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईतील धारावीत झोपडपट्टीला भीषण आग;  २५ घरे जळाली…आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश..

मुंबईतील धारावीत झोपडपट्टीला भीषण आग;  २५ घरे जळाली…आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश..

 

मुंबई : प्रतिनिधी 

धारावी कमला नगर झोपडपट्टीला लागलेली आग सकाळी ८ च्या सुमारास आग आटोक्यात आली आहे. सुमारे ४ तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले.

झोपडपट्टीत गारमेंट, बेकरी, गोडाऊन म्हणून वापर केल्या झोपड्यांमधील इलेक्ट्रिक वायरिंग, कपडे, पेपर, शिलाई मशीन आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अग्निशमन दल ते बचावकार्य करत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. धारावी येथील कमला नगर येथील झोपड्यांना आग लागल्यानंतर १२ फायर इंजिन व ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग सकाळी ४.२० च्या दरम्यान लागली आहे. आगीत अद्याप कोणीही जखमी नसल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

 

:धारावी हा परिसर झोपड्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी दाटीवाटीने मोठ्या संख्येने झोपड्या आहेत. या झोपड्यांमध्ये दहा लाख रहिवासी वास्तव्य करतात. अशा या दाटीवाटीच्या परिसर असलेल्या धारावीमधील कमला नगर झोपडपट्टीला पहाटे ४.२० च्या दरम्यान आग लागली. अनेक रहिवासी झोपेत असतानाच आग लागल्याचे कळताच परिसरातील रहिवाशांनी तेथून पळ काढला. परिसरात आरडाओरड सुरू झाली.

कमला नगरमधील रहिवाशांनी आगीची माहिती मुंबई अग्निशमन दलाला पहाटे दिली. आग लागली त्या ठिकाणच्या बाजूलाच धारावी अग्निशमन केंद्र आहे. येथील अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. या परिसरात मोठ्या प्रमाणात अरुंद रस्ते असल्याने अग्निशमन दलाची वाहने आत जाणे अडचणीचे ठरत होते. मात्र त्यानंतरही अग्निशमन दल आगीच्या ठिकाणी पोहचले. बाजूला लागून दाटीवाटीने झोपड्या असल्याने आग पसरत जात होती. यामुळे पहाटे ५.१४ वाजता आग लेव्हल ३ ची असल्याची घोषणा अग्निशमन दलाने केली.

आगीची भीषणता वाढत असल्याने अग्निशमन दलाने आगीची लेव्हल ३ ची घोषणा केल्यावर इतर अग्निशमन केंद्रावरील वाहने आगीच्या ठिकाणी बोलावण्यात आली. पुढील काही वेळात १२ फायर इंजिन ८ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. आगीच्या ठिकाणाहून सर्व रहिवासी बाहेर पडल्याने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मुंबई अग्निशमन दल व पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान ही आग का लागली? याची चौकशी अग्निशमन दलाकडून केली जाणार आहे. आग व इमारतींचे भाग, घरे, भिंती कोसळणे, समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडणे अशा २०१३ पासून २०१८ या ५ वर्षांच्या कालावधी ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे

संबंधित पोस्ट

क्रूझ पार्टीप्रकरणी, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मिळणार जामीन?

महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित महावाङ्मय प्रकाशित करण्यात येईल – मंत्री अतुल सावे

पोलादपूर लघु पाटबंधारे योजनेसाठीभूसंपादनाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी* 

पॅरामेडीकल गटातील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी करता येणार- मंत्री मंगल प्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta