vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ

वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ..

 

राज्य प्रतिनिधी

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याचे, उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथी गृह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तिन्ही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, तिन्ही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात मध्ये 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे. तसेच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधी करीता पाच हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा रू.500/- चा भत्ता आता रु.1000/- इतका करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

 

संबंधित पोस्ट

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार राजभवन येथे संपन्न**विजयकुमार गावित,  संजय राठोड, सुरेश खाडे, तानाजी सावंत, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांसह १८ जणांना मंत्री पदाची शपथ

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024/ 18-जालना लोकसभा मतदारसंघ,कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्याचे जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापकांचे निर्देश

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

शहरांतील कुपोषण मुक्तीसाठी विशेष उपक्रम राबवा; झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीवर भर द्या! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील १०० दिवसांमध्ये महिला व बालविकास विभागाने करावयाच्या कामांचा आढावा

राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत,. मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची परिस्थिती…