vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ’सदैव सज्ज’,हाच आपत्ती व्यवस्थापनाचा मंत्र-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आपत्ती ही काही सांगून येत नाही. मात्र सततचा अभ्यास, प्रशिक्षणाद्वारे सदैव सज्ज राहिल्यास आपण संभाव्य आपत्तीचा सामना करून जीवित व वित्त हानी टाळू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज सरस्वती भुवन विद्यामंदिरात प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे लेफ्ट. आर. जी. यादव, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. दिनेश वकील, डॉ. रश्मी बोरीकर, मुख्याध्यापक निकुंभ, डॉ. सविता मुळे,श्रीमती आश्विनी भोसले आदी उपस्थित होते.

   जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आपत्तीचे अनुमान करता येत नाही. मात्र आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहू शकतो. या परिचय प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे आपण हिच सज्ज असण्याची तयारी करत आहोत. आपल्या घरातील लहान लहान प्रसंगात ही सज्जता आपल्याला उपयोगी पडते. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून हे प्रशिक्षण देऊन आपत्ती व्यवस्थापन सज्ज नागरिक घडवण्याचे उद्दिष्ट आहे. हेच विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे विविध सत्र जिल्ह्यात आयोजित केले आहेत. आपत्ती व्यवस्थापनातून सज्जतेचे धडे घेऊन येणाऱ्या आपत्तीना आपण सामोरे जाण्यासाठी सज्ज होऊ.

 प्रास्ताविक आश्विनी भोसले यांनी तर अध्यक्षीय समारोप ऍड. वकील यांनी केला. मंगेश डोलारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००००

संबंधित पोस्ट

आदिवासी व कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा !

काँग्रेस नेते राहुलगांधी यांच्या दिल्ली तीन निवासस्थानी- इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिवसेना-भाजपची टीका

राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा सर्जनशील जाहिरातींच्या संकल्पना, डिझाईन याबरोबरच टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वर्ल्डवन एनर्जी कंपनीच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात उत्तम परिसंस्था निर्माण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमरेड येथे सौर व हरित हायड्रोजन ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

vishwatmaklokswamivarta

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र संघटकपदी विकासकुमार बागडी…

vishwatmaklokswamivarta