vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पुण्यातील महिलांसाठी महिला दिनानिमित्त प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेस ‘तेजस्विनी’ बस मधून करू शकणार मोफत प्रवास…

पुण्यातील महिलांसाठी महिला दिनानिमित्त प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेस ‘तेजस्विनी’ बस मधून करू शकणार मोफत प्रवास…

 

पुणे प्रतिनिधी

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो

आज, 8 मार्च रोजी जगभरातील अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन  साजरा केला जातो. भारतामध्येही मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा होत आहे. आता या दिनाचे औचित्य साधत पुणे (Pune) शहरातील महिला आणि मुलींना एक विशेष सेवा देत, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने महिन्याच्या प्रत्येक 8 तारखेला महिलांसाठी संपूर्ण दिवस मोफत बस सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा महिला दिनापासून म्हणजेच 8 मार्च 2023 पासून तेजस्विनी बसद्वारे उपलब्ध होईल.

तेजस्विनी बस ही 8 मार्च 2018 रोजी सादर केली गेली होती. मात्र या बससेवेला प्रतिसाद न मिळाल्याने, कोविड-19 काळात ती बंद करण्यात आली. नंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता महिला दिनानिमित्त पीएमपीएमएल महिला प्रवाशांना या बसद्वारे शहरात मोफत प्रवास सेवा देणार आहे. तेजस्विनी बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करण्याचे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करणारा जागतिक दिवस आहे. आजच्या दिवशी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. मीरा भाईंदर-म्युनिसिपल कॉर्पोरेशन (MBMC) च्या सार्वजनिक वाहतूक युनिटने देखील 8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना मोफत प्रवासाची ऑफर दिली आहे. प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांना मोफत बससेवा उपलब्ध करून देण्याचा विचार नागरी संस्था करत आहे

संबंधित पोस्ट

२८८ मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत ३२५९ उमेदवारांचे ४४२६ नामनिर्देशन पत्र दाखल विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४

vishwatmaklokswamivarta

गर्भाशयमुख कर्करोगावरील लसीकरणासाठी सिरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठकराज्यात नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करण्यासाठी बृहत् आराखड्यास मान्यता…

अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा, कोर्टाकडून जामीन मंजूर; राष्ट्रवादी काँग्रेससह कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक!*कुंभमेळ्यात सनातन धर्म सोप्या भाषेत समजून घेण्याची भाविकांना अनमोल संधी !*सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कृति प्रदर्शन’ आयोजन !*

vishwatmaklokswamivarta

धारावी वाचविण्यासाठी २ आगस्ट ला आझाद मैदानात उपोषण…..

vishwatmaklokswamivarta