धारावी वाचविण्यासाठी २ आगस्ट ला आझाद मैदानात उपोषण…..
मुंबई: प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका जी / उत्तर विभाग यांच्या हद्दीतील धारावी विभागात मोठया प्रमाणात दोन, तीन, चार माळयाच्या वाढीव अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊन बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात तसेच
अनाधिकृत बांधकामाचे संरक्षक ठाकरे गटाचे माजी नगरसेवक टी एम जगदीश याच्यावर मानसिक छळ मारहाण करण्याचा,जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या करण्याच्या मागणी करता सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर स्वामी हे २ आगस्ट रोजी आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे, अशी माहिती आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वामी यांनी दिली.
धारावी परिसरात मोठ्या प्रमाणात वाढीव अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. गेल्या २५ वर्षापासून धारावीचे पुनर्वसन रखडले आहे. आता मात्र धारावी विकासाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना काही महाभाग कॉन्ट्रक्टर , राजकीय माफीया, कॉन्ट्रक्टर धारावीच्या विकासात अडथळा आणण्याचे प्रयत्न चालू असल्याचे दिसून येत आहे. परिसरात मोठया प्रमाणात सदर मंडळीही अनधिकृत बांधकामाचे समर्थन मुकपणे करीत आहेत .मात्र धारावीचा विकास व्हावा ही आमची प्रामाणिक पणे इच्छा असून काही विघ्न संतोषी लोकांकडून या कामात अडथळा निर्माण केला जात आहे. गेल्या १२ वर्षा पासून विश्वात्मक सामाजिक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही अनधिकृत बांधकामा संदर्भात जनजागृती करत आहोत मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांचे राजकीय नेत्यांसोबत असलेल्या सबंधामुळे अशा बांधकामावर कारवाई होत नाही .
अशा अनधिकृत बांधकामांना संरक्षण देऊन बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि अनाधिकृत बांधकामाचे संरक्षक
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक टी एम जगदीश याच्यावर मानसिक छळ मारहाण करण्याचा,जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या करण्याच्या मागणी करिता ,२ आगस्ट रोजी आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे, असे चंद्रशेखर स्वामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.