vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

उष्माघात*_*उन्हामुळे मृत्यू का होतो* ?

उष्माघात*_*उन्हामुळे मृत्यू का होतो* ?

आरोग्य प्रतिनिधी

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?

 

*आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात*.

 

घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, *सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक* आहे.

 

पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.

 

– जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

 

*शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं* (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)

 

– *स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात*.

 

*रक्तातलं पाणी कमी झाल्या* मुळे *रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना* (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.

– माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

 

उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व *आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे*..

 

*ऊष्माघात टाळा*.

 

*उन्हाचा पारा चढत आहे*.. त्यामुळे *उष्माघात टाळण्या* साठी खालील उपाययोजना करा..

शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ते ६.३० या कालावधीत करा.

 

– *काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या*.

 

शक्यतो सुती (काँटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.

 

– *डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा*.

 

– आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा.

 

– कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबत, नारळपाणी याचा वापर करा.

 

*दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळा*.

 

– लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका.

 

*अशक्तपणा,थकवा, ताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास* तत्काळ डाॕक्टरांचा सल्ला घ्या.

 

ही पोस्ट फक्त पंधरा नव्हे तर हजारो लोकांना पाठवा. फक्त चांगली बातमी येईल याची अपेक्षा न करता चांगल्या बातम्या तयार करा

🙏🙏🙏🙏

संबंधित पोस्ट

लम्पी आजारांच्या नियंत्रणासाठी पशुपालकांनी उपाययोजना राबवावी;लंपी चर्मरोग प्रतिबंधासाठी लसीकरण मोहिम..

राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रम; जिल्ह्यात ४२ पथकांमार्फत होणार तपासणी

विशेष लेख -मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार..

vishwatmaklokswamivarta

• हिवतापाचे नियंत्रणविशेष लेख :-   25 एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात आजपासून स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानतालुकास्तरीय आरोग्य शिबिरांचा महिलांनी लाभ घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम

vishwatmaklokswamivarta

गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ