vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई मेट्रो घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, मेट्रो सेवा विस्कळीत; मेट्रो स्थानकावर प्रवाशांची गर्दी

मुंबई मेट्रो घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, मेट्रो सेवा विस्कळीत; मेट्रो स्थानकावर प्रवाशांची गर्दी

[ मुंबई प्रतिनिधी

घाटकोपर-वर्सोवा मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली होती. मेट्रो प्रशासनाने बिघाड दुरुस्त केल्याचा दावा केला आहे. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर-मेट्रो वाहतूक विस्कळीत झाली होती. असल्फा मेट्रो स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मेट्रो वाहतूक ठप्प झाली होती.

सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घाटकोपर-मेट्रो वाहतूक विस्कळीत झाली होती. असल्फा मेट्रो स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने मेट्रो वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही मार्गावरील मेट्रो वाहतूक थांबवण्यात आली. प्रवाशांना नजीकच्या स्थानकात उतरवण्यात आले. ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

 

मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या बिघाडामुळे मनस्ताप सहन करावा लागला. इच्छित स्थळी जाण्यासाठी बेस्ट बस, रिक्षाचा पर्याय वापरावा लागला. त्याच्या परिणामी बसमधील गर्दी आणखीच वाढली. तर, रिक्षा मिळवण्यासही अडचणी निर्माण झाल्या.

 

मेट्रो प्रशासनाने 5.40 वाजण्याच्या सुमारास ट्वीट करून वाहतूक सुरळीत केली असल्याचा दावा केला. मात्र, जवळपास तासभर वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल झाले. या बिघाडामुळे मेट्रोच्या काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.

 

मुंबई मेट्रोतील तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रोचे तिकीट काढलेले असताना बस, रिक्षा आणि लोकलसारख्या पर्यायांचा वापर करावा लागला असल्याने मुंबईकरांनी मेट्रो प्रशासनावर ताशेरे ओढले.

 

मेट्रो तांत्रिक बिघाडाबद्दल माहिती दिल्यानंतर मेट्रो स्थानकांवर अडकलेले प्रवासी मेट्रो प्रशासनावर चांगलेच बरसले. सोशल मीडियावरुन मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनंतर काहींनी मेट्रो प्रशासनाच्या काही तांत्रिक बिघाडावरुन सुनावले. ‘मुंबई मेट्रो’ने स्वत:चे नाव बदलून ‘मुंबई लेट हो’ ठेवावे असा सल्ला काही संतप्त प्रवाशांनी दिला.

 

मुंबई मेट्रोच्या तांत्रिक बिघाडाचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. मेट्रो प्रवाशांनी ऑटो रिक्षा प्रवासाचा पर्याय निवडल्याने घाटकोपर-अंधेरीदरम्यानची वाहतूक कोंडी वाढली.

संबंधित पोस्ट

घरेलू कामगारांना कोविड काळातील आर्थिक मदत द्या भारतीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेची राज्य सरकारकडे मागणी

vishwatmaklokswamivarta

हवामान बदल आणि मानवी आरोग्य विषयावर कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत रबाळे व बेलापूर येथे तिरंगा रॅलीचे आयोजन

लाडक्या बहिणींच्या अनुदानातील कपात थांबवा नसता तीव्र आंदोलन छेडणार – कैलास गोरंटयाल

सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी उर्फी जावेदला नोटीस; मुंबई पोलिसांनी घेतली चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल

vishwatmaklokswamivarta

३ वर्षाच्या अपहरण झालेल्या मुलीची मुंबई पोलिसांनी वरळी पोलिसांनी काही तासातच सुटका केली.

vishwatmaklokswamivarta