
छत्तीसगड दंतेवाडा मधील आयडी अटॅक मध्ये शहीद 10 जवान 1 वाहन चालकाच्या नावाची यादी जारी…
छत्तीसगड प्रतिनिधी
छत्तीसगड मधील दंतेवाडा मध्ये आज आयईडी अटॅक झाला आहे. या स्फोटामध्ये 10 जवान आणि एका चालकाचा जीव गेला आहे. या 11 शहीदांची नावं जाहीर करण्यात आली आहे.
छत्तीसगड मधील दंतेवाडा मध्ये आज आयईडी अटॅक झाला आहे. या स्फोटामध्ये 10 जवान आणि एका चालकाचा जीव गेला आहे. या 11 शहीदांची नावं जाहीर करण्यात आली आहे. वाहकाचं नाव Dhaniram Yadav आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरून जवान शोधासाठी निघाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करत त्यांना लक्ष्य केले.
छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे माओवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात 10 पोलिस कर्मचार्यांसह 11 जण ठार झाले. दंतेवाडा माओवाद्यांच्या हल्ल्यात एका नागरिकालाही आपला जीव गमवावा लागला आहे. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूरजवळ जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर आयईडी हल्ल्यात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, नक्षलवाद्यांनी आयईडी पेरला होता. ज्या भागात स्फोट झाला तो भाग राज्याची राजधानी रायपूरपासून सुमारे 450 किमी अंतरावर आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपण येथे हा व्हिडिओ पाहू शकता.



