vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

राजकीय वर्तुळात खळबळ:राजीनामा नाट्यानंतर शरद पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून टीकास्त्र..

राजकीय वर्तुळात खळबळ:राजीनामा नाट्यानंतर शरद पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून टीकास्त्र..

 

राजकीय प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनभावनेचा आणि कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचा आदर राखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला आहे. मात्र, राजकीय गोटात उलट सुलट चर्चा होताना दिसत आहे. अशातच मित्र पक्ष ठाकरे गटाने थेट शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.

 

राजीनामा नाट्यानंतर शरद पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. इतकचं नव्हे तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे. वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले असा आरोप सामना अग्रलेखात करण्यात आला आहे.

वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी…राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत. त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच.

 

पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला व यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाटय़ावर पडदा पडला आहे. आणि आधी

अशा शब्दात सामना अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली.

संबंधित पोस्ट

काँग्रेसची आश्वासने म्हणजे लबाडाघरचे आवताण- उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

विजय नक्की, शिवसेना व्हीपनुसार मतदान झालं नाही तर ते अपात्र होतील – राजन साळवी..

शिवसेना पक्षचिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गट-शिंदे गट आमनेसामने; एकमेकांवर टीकास्त्र सोडत पक्षचिन्ह गमावल्याची खंत व्यक्त..

 पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ विधानसभा आमदार रवींद्र धंगेकर  यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  वर टीका

मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार — काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मुंबईत घोषणा.

vishwatmaklokswamivarta