vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी  मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍यांना ड्रेसकोडचं  बंधन मागे घेण्यात आले

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी  मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍यांना ड्रेसकोडचं  बंधन मागे घेण्यात आले

राज्य प्रतिनिधी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी  मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍यांना ड्रेसकोडचं बंधन घालण्यात आलं होतं. पण हा निर्णय भाविकांना विश्वासात न घेता आणि अचानक लादल्याने काही मागील काही तास मंदिरात गदारोळाचं वातावरण निर्माण झालं

 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी  मातेच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार्‍यांना ड्रेसकोडचं बंधन घालण्यात आलं होतं. पण हा निर्णय भाविकांना विश्वासात न घेता आणि अचानक लादल्याने काही मागील काही तास मंदिरात गदारोळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण आता हे निर्बंध मागे घेतले असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारावर भाविकांना हाफ पॅन्ट, बर्मुडा किंवा उत्तेजक कपडे घातल्यास प्रवेश दिला जात नव्हता. काही भाविकांना मंदिराच्या प्रवेश द्वारावरील सुरक्षा रक्षकांनी हटकले होते. पण आता हा नियम मागे घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

थ्री- पुरूष सह लहान मुलांना देखील ड्रेसकोडच्या नियमावलीनुसार, मंदिरात जाण्यापासून रोखले होते. यावरून गदारोळ झाल्यानंतर आता तुळजाभवानी मंदिर संस्थांनाचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी नोटीस जारी करत तुळजाभवानी मंदिरामध्ये पूजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध घालण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तुळजापूरच्या मंदिरामध्ये राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविक दर्शनाला येतात. हे देवस्थान साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. देवीचा जागर करण्यासाठी इथे भाविक येतात. सध्या सुट्ट्यांचा काळ सुरू असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहे. पण अचानक नियमावली जारी केल्याने काहींना दर्शनापासून दूर ठेवल्याने त्यांनी नाराजीचा सूर बोलून दाखवला आहे.

 

संबंधित पोस्ट

दहशतवादी हल्ल्यातील पोलीस हुतात्मांना राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या पैठण मधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभेची सुरुवात, ही गर्दी शिवसैनिकांची…

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ चित्ररथ सज्ज

vishwatmaklokswamivarta

वेंगुर्ला येथे वादळी वारे अन् उधाणलेला समुद्र;  बंदरात खलाशांची बोट उलटली, दोघांचा मृत्यू

मुंबईत 14 जानेवारीपासून सुरु होणार आयकॉनिक डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस; जाणून घ्या कुठे बुक कराल तिकिटे

vishwatmaklokswamivarta

पद्म पुरस्कार-२०२६ साठी नामांकन सादर करण्यासाठी अंतिम मुदत; १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली