vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची जलपातळी घटली, वैतरणा धरणा मध्ये केवळ 10% पाणी…

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची जलपातळी घटली, वैतरणा धरणा मध्ये केवळ 10% पाणी…

 

राज्य प्रतिनिधी

मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणातील पाणीसाठी दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.

मुंबई करांची तहान भागवणाऱ्या धरणांतील  पाणीसाठा झपाट्याने तळ गाठू लागला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठा 10.75 टक्क्यांवर आला आहे, तर राज्यातल्या सुमारे तीन हजार धरणांमधील पाणीसाठा29 टक्क्यांवर आला आहे

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठा 10.75 टक्क्यांवर आला आहे, तर राज्यातल्या सुमारे तीन हजार धरणांमधील पाणीसाठा (Water Storage) 29 टक्क्यांवर आला आहे. मान्सून (Monsoon) महाराष्ट्रासह देशात दाखल व्हायला अवकाश आहे. राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी मुंबई आणि परिसर मात्र कोरडाठाक आहे. यामुळे पाऊस आणखी रखडल्यास जून महिन्यात मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातूनअधिकचे पाणी मिळावे यासाठी महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी मध्य वैतरणा या धरणात 10.75 टक्के, तर  वैतरणा धरणात 29.91 टक्के, भातसा धरणात 32.48 टक्के, मोडक सागर धरणात 47.98 टक्के तर तानसा धरणात 36.99 टक्के पाणीपुरवठा सध्या उपलब्ध आहे

राज्यासह मुंबईत मान्सूनचे आगमन विलंबाने होणार असून मुंबईत मात्र तापमानाचा पारा चढाच असून उकाडा कायम आहे. मुंबईचे कमाल तापमान 34 अंशांवर स्थिर आहे. शहरातील आर्द्रता मात्र अधिक आहे. परिणामी उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मान्सून दाखल होईपर्यंत नागरिकांना अशाच काहीशा तापदायक वातावरणाला सामोरे जावे लागणार आहे. जास्त उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन ही मोठ्या प्रमाणावर होत आहे त्यामुळे देखील पाण्याच्या साठ्यात मोठी घट होत आहे.

 

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा कायद्याविरोधात ३ एप्रिलला पत्रकारांचे मुंबईत आंदोलन…

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालीमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये सुधारणा संदर्भात बैठक.. 

vishwatmaklokswamivarta

वस्त्रोद्योग विभाग:यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट शिथील..

लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी, जिजाऊंच्या लेकीविरोधात अपशब्द प्रकरणी खारघर पोलीस स्टेशनला निवेदन

vishwatmaklokswamivarta

अन्न सुरक्षिततेकडून पोषण सुरक्षेकडे“ठाणे मिलेट महोत्सव” दि.5 ऑक्टोबर रोजी

मुंबईतील आझाद मैदान मराठा आंदोलनावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया