vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यासाठी २४ तास धोक्याचे, ठाण्यासह १९ जिल्ह्यांना हवामान विभाग कडून पावसाचा अलर्ट जारी..

 राज्यासाठी २४ तास धोक्याचे, ठाण्यासह १९ जिल्ह्यांना हवामान विभाग कडून पावसाचा अलर्ट जारी..

राज्य प्रतिनिधी

मान्सूनचं आगमन उशिराने होत असल्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून लांबणीवर पडलेला मान्सून आज केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांचा परिणाम स्थानिक हवामानावरही होत असून यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ऊन तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर सुरू आहे.

 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये ५ जून रोजी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात मात्र बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे राहिल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

 

राज्यात कुठल्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता…

IMD मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच ५ जून रोजी ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, जालना, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ६ जून रोजीही बहुतांश जिल्ह्यांत पावसाचा अंदाज असून यानंतर मात्र काही ठिकाणी उन्हाच्या झळा बसतील असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

 

अरबी समुद्रात चक्रीवादळाचं सावट…

दरम्यान, आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा ४ जूनला मान्सूनचे केरळमध्ये आगमन अपेक्षित होते. मात्र, तसे झालेले नाही. अरबी समुद्रात आता कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता वर्तवण्यात आल्याने पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची प्रगती वेगाने होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘आयएमडी’ने शनिवारी वर्तवलेल्या अंदाजानुसार ५ जूनला आग्नेय अरबी समुद्रात वातावरणात चक्रीय स्थिती तयार होण्याची शक्यता असून, त्यापुढील ४८ तासांत तिथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. एका हवामानशास्त्रीय मॉडेलनुसार या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते.

 

या चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर मोसमी वाऱ्यांचा जोर वाढू शकतो. वादळामुळे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किनारपट्टीवर सर्वदूर पाऊस होऊन मान्सूनची प्रगतीही वेगाने होऊ शकते, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

संबंधित पोस्ट

केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्राचे ‘स्टेट मन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन‘ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मीरा-भाईंदर येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वन्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयीन नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न..

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन, 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

आज पासून मुंबईत जागतिक हृदय दिनानिमित्त, महानगर पालिका करणार जनजागृती

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतले श्रींच्या समाधीचे दर्शन..