
राज्यासह देशभरात मान्सूनला दमदार सुरूवात: पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज..
राज्य प्रतिनिधी
राज्यासह देशभरात मान्सूनला दमदार सुरूवात झाली असून येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता…
पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळे मोसमी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. हवामान विभागाने 27 आणि 28 जून रोजी विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे
तर मुंबईत आजपासून 2 दिवस मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून बुधवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय राज्याच्या इतरही काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला
नाशिक, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्येही आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज/यलो अलर्ट जारी केला आहे



