vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्या शपथविधीमुळे शिंदे गटात नाराजी नाट्य? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्या शपथविधीमुळे शिंदे गटात नाराजी नाट्य? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक…

 

मुंबई प्रतिनिधी

 महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ वाजवणारे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार  यांनी काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या घटनेनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उलट सूलट चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी तातडीने आपल्य गटातील आमदार तसेच मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील बाळासाहेब भवनात दुपारी 4 वाजता ही बैठक बोलावण्यात आली आहे.

बैठकीआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील मंत्री तसेच आमदार खासदारांसह सर्व पदाधिकारी दुपारी २ वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेणार आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर शिंदे गटात मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्याच आमदारांना जास्त निधी देत होते, मुख्यमंत्रीपद वगळता उद्धव ठाकरे यांच्या हातात सरकारमधील काहीही नव्हतं, असा दावाही शिंदे गटातील आमदारांनी केला होता. त्याचबरोबर भाजपसोबत जाऊन आपण हिंदुत्व कायम राखलं, असा दावाही शिंदे गटातील आमदारांनी केला होता.

मात्र आता अजित पवार हेच शिंदे – भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि खासदार नाराज असल्याची बातमी आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्याआधीच मंत्रिपद मिळाल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचं बोललं जातंय. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीत आमदार आपली नाराजी व्यक्त करतात का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

विकसित भारत संकल्प यात्रा‘आयुष्मान भारत’ योजनेद्वारे सुरक्षित करा आपले,आपल्या कुटुंबियांचे आरोग्य विकसित भारत संकल्प यात्रेत नवीन कार्ड घेण्याची, ई- केवायसी करण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta

बलिदानाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवू” -राज्य मंत्री माधुरी मिसाळ“हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा“नगारा फतेह दा” या चित्रगीताचे प्रकाशन…

संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी वाढली, जामीनावर 14 दिवसांनी पुन्हा सुनावणी

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागरी भागातील बालाकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त- मंत्री आदिती तटकरे,सुपोषित मुंबई अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजनेचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

कर्नाटकमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, भाजप पराभवाच्या छायेत, निकालाबद्दल जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी