
आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस…
मुंबई प्रतिनिधी
पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काल अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नवीन शपथ घेतलेल्या मंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी, बोगस बियाणे, पावसाचे संकट, दुबार पेरणी असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं असून काही वेळातच विधानसभेचे कामकाज एका दिवसासाठी स्थगित करण्यात आले होते. विधानपरिषदेत विरोधकांनी सभापती नीलम गोऱ्हे यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यांच्या निलंबनासाठी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. तर काही वेळाने विधापरिषदेचे कामकाजही कालच्या दिवसासाठी स्थगित करण्यात आले.
विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता सुरूवात होणार असून विधानपरिषदेचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. पण आजचा दिवस विविध प्रश्नांवर गाजण्याची शक्यता आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कथित व्हिडिओ क्लीप प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली असून त्यावरून विरोधक गोंधळ करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शेतकरी, महिला प्रश्न यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे.



