
बंगळुरु येथे नुकत्याच पार पडलेल्या विरोधकांच्या इंडिया वर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयमएमआयएम पक्षा ची जोरदार टीका….
मुंबई प्रतिनिधी
बंगळुरु येथे नुकत्याच पार पडलेल्या विरोधकांच्या ग्रुप इंडिया वर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयमएमआयएम पक्षाने जोरदार टीका केली आहे. विरोधकांना आमचा पक्ष अस्पृश्य आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला निमंत्रीत केले नाही. बाकी सर्वांना बोलावले फक्त आम्हीच त्यांना वर्ज्य आहोत, असे म्हणत या पक्षाने नव्याने स्थापन झालेल्या आघाडीवर टीका केली आहे. एआयमएमआयएम प्रवक्ते वारिस पठाण यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, आम्ही त्यांच्यासाठी राजकीय अस्पृश्य आहोत.
आम्ही त्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांना पाहिले. ज्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत विरोधकांवर जहरी टीका केली होती, शिव्या दिल्या होत्या. पण आता ते बंगळुरुमध्ये उपस्थित होते. तेथे नितीश कुमार, उद्धव ठाकरे आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. जे पूर्वी भाजपसोबत होते.
दरम्यान, आम्ही कधीच भाजपसोबत गेलो नाही. त्याऊलट असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा पराभव करण्यासाठी एआयमएमआयएम नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. असे असतानाही त्यांनी आम्हाला बोलावले नाही. आम्हीही विरोधी पक्षात आहोत. असे असतानाही त्यांनी आम्हाला बोलावले नाही, असे म्हणत वारीस पठाण यांनी विरोधकांवर टीका केली.



