vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ.

मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ..

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून असलेला पावसाचा जोर आजही कायम आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणातील  पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत चालली आहे. या मुसळधार पावसामुळे  मुंबईचा पाणीप्रश्न सुटणार अशी चर्चा सुरु झाली आहे. जर पावसाने मुंबईत पावसाने अशीच मुसळधार हजेरी लावली तर मुंबईकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 48 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापर्यंत मुंबईला हे पाणी पुरेल असं सांगण्यात येत आहे.

मुंबईकरांना अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून असलेला पावसाचा जोर आजही कायम आहे. हवामाना विभागाने आज रविवारी मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी दिवसभर मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला असून प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

मुंबईकरांना पाणी पुरवठा करणारे अप्पर वैतरणा धरण, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांचा समावेश आहे. यामधील तुळशी हे धरण 100 टक्के भरले आहे. तर तानसा धरणामध्ये 86.66 टक्के पाणीसाठा झाला आहे. अप्पर वैतरणा धरणामध्ये 19.20 टक्के, मोडक सागर धरणामध्ये 75.17 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मध्य वैतरणा धरणामध्ये 56.23 टक्के, भातसा धरणातही  56.23 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विहार धरणामध्ये 75.82 टक्के पाणीसाठा झाला आहे.

 

 

संबंधित पोस्ट

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवादअपेक्षा, विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत केले आश्वस्त..

vishwatmaklokswamivarta

कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात  आज तातडीची सुनावणी  – नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं,कबुतरखान्यांवरील बंदी कायम; हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; लाडक्या बहिणींनी केले औक्षण आणि अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

विकसित कृषी संकल्प अभियानाचे-जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न..             

निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक…

vishwatmaklokswamivarta

सहा डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार  अनारक्षित विशेष फेर्‍या…

vishwatmaklokswamivarta