vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

वाराणसी येथे काशी विश्वनाथ मंदिर जवळ ए एस आय ची टीम ज्ञानव्यापी मशिद परिसरामध्ये चोख बंदोबस्तामध्ये सर्वे करण्यास सुरुवात

वाराणसी येथे काशी विश्वनाथ मंदिर जवळ ए एस आय ची टीम ज्ञानव्यापी मशिद परिसरामध्ये चोख बंदोबस्तामध्ये सर्वे करण्यास सुरुवात.

 

उत्तर प्रदेश प्रतिनिधी उत्तर प्रदेश वाराणसी येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या बाजूला च्या बाजूला ही ज्ञानव्यापी मशिद आहे. सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेला हा सर्व्हे आज दुपारी 12 पर्यंत चालण्याची शक्यता आहे. 

अलहाबाद न्यायालयाने (Allahabad High Court) काल सुनावणी दरम्यान सायंटिफिक सर्व्हे करण्याला हिरवा कंदील दिल्यानंतर आज 4 ऑगस्ट दिवशी ए एस आय  कडून ज्ञानव्यापी मशिद परिसरामध्ये करण्याला सुरूवात झाली आहे. 17व्या शतकातील ही मशिद हिंदू मंदिरावर उभारली आहे का? याचं उत्तर यामधून शोधण्याचा प्रयत्न आहे. आज सकाळी 7 च्या सुमारास या सर्व्हेला सुरूवात करण्यात आली आहे.

ASI टीम मेंबर्स आणि हिंदू याचिकाकर्ते ज्ञानव्यापी मशिद परिसरामध्ये आले आहेत. त्यांच्या सोबतीला कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. अंज मन इजिदमा कमिटी सदस्यांनी या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाचे समर्थन केल्यानंतर आणि प्रस्तावित पाऊल “न्यायाच्या हितासाठी आवश्यक” आहे आणि दोन्ही बाजूंना फायदा होईल असा निर्णय दिल्यानंतर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. कायदेशीर वादात मुस्लिम बाजूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंजुमन इंतेजिमा मज्जित कमिटी ने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा आदेश आला आहे.

 

संबंधित पोस्ट

विश्वबंधुत्वाचा भाव प्रदर्शीत करणारा महाराष्ट्राचा 59वा निरंकारी संत समागम भव्य रुपात संपन्न

vishwatmaklokswamivarta

मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा -जिल्हाधिकारी संजय यादव

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल दरवाढीचा भडका… आज की उद्या? पेट्रोलच्या किंमतीत 10 ते 12 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता…

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत निर्णय लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

योजना चुकीच्या लाभार्थ्यांनांच लाभ मिळतात- प्रशासकीय यंत्रणेवर शासनाचा अंकुश असणे गरजेचे दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे भोकरदन येथील भुमिहिन,बेघर, निराधारांचा मेळावा संपन्न

साहित्य अकादमीचा साहित्योत्सव होणार दिमाखदार;7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीमध्ये भव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta