vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

माझी माती माझा देश या उपक्रमातून माती विषयी अधिक प्रेम,आपुलकी निर्माण होईल     – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

माझी माती माझा देश या उपक्रमातून माती विषयी अधिक प्रेम,आपुलकी निर्माण होईल     – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

 

सांगली प्रतिनिधी: मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या उपक्रमातून देशवासियांमध्ये आपल्या मातीविषयी अधिक प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल, असा विश्वास कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केला.

 

आझादी का अमृत मोहोत्सवांतर्गत मिरज हायस्कूल मिरज येथे उभारण्यात आलेल्या शिलाफलकमचे अनावरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. मिरज हायस्कूल येथे झालेल्या या कार्यक्रमास खासदार संजय पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महापालिकेचे आयुक्त सुनील पवार, तहसीलदार अपर्णा धुमाळ, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे आदि उपस्थित होते.

 

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता समारंभनिमित्त माझी माती माझा देश हा उपक्रम देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या उपक्रमातून जन माणसात नव चैतन्य निर्माण होत आहे. या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊया असे आवाहन त्यांनी केले.

 

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते मॉडेल स्कूलचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी केले व मिरज हायस्कूल मध्ये राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती प्रास्ताविकात दिली.

 

०००००

संबंधित पोस्ट

रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी सामाजिक चळवळ उभी राहावी  – प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 चे उद्घाटन…

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची घेतली भेट* 

आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करावे**- जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी*

vishwatmaklokswamivarta

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पीक विम्याची नुकसान भरपाई अदा – पीक विमा जिल्हा व्यवस्थापक 

vishwatmaklokswamivarta

रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाचीसांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी, 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, 2210 जातीचे दाखले वाटप

५० हजार हक्काची घरे देण्यासाठी मिशन मोडवर काम करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta