vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राज्यात 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती; वेळापत्रक जाहीर…

राज्यात 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती; वेळापत्रक जाहीर…

 

राज्य प्रतिनिधी

संपूर्ण राज्यातील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित शिक्षक भरतीला अखेर मुहूर्त सापडला आहे. शिक्षक भरतीचे वेळापत्रक झाले. यामुळे अनेक दिवसांपासून शिक्षक भरतीची आतुरता आता संपणार आहे. राज्यात मंगळवार (ता. १५)पासून भरतीला सुरवात झाली.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकभरती आता ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे.

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये सद्य:स्थितीत ६४ हजार शिक्षकांची कमतरता आहे.मात्र, शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे. त्यासाठी खासगी संस्थांना त्यांच्याकडील रिक्त शिक्षकांच्या पदांची माहिती बिंदूनामावलीसह पोर्टलवर अपलोड करावी लागेल. नंतर त्या शाळेत राज्य पातळीवरून एका जागेसाठी तीन उमेदवार पाठविले जाणार आहेत. तीनपैकी संस्थेला एका उमेदवाराची निवड करावी लागेल. या प्रक्रियेमुळे खासगी संस्थांचा मनमानी कारभार थांबणार आहे.राज्य शासनाचा निवृत्त शिक्षकांना १० ते १२ पटसंख्या असलेल्या शाळांवर नियुक्तीचा निर्णय आहे. ही नियुक्ती शिक्षण सारथी योजनेंतर्गत होईल. निवड झालेल्या निवृत्त शिक्षकाला १० हजार रुपये मानधन दिले जाईल.सारथी योजनेंतर्गत ७० वर्षांपर्यंतचे निवृत्त शिक्षक नियुक्तीसाठी पात्र आहेत. निवृत्त शिक्षकांची नियुक्ती झाल्यास शिक्षक भरतीमधील रिक्त पदांची संख्या कमी होणार असल्याची शक्यता आहे

अशी असणार भरती प्रक्रियासंच मान्यता पूर्ण होताच शिक्षक भरतीला सुरवात होईल. मात्र, त्यापूर्वी बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण होईल. १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान पोर्टलवर जाहिरात अपलोड होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीनुसार आणि ‘टेट’ व ‘सीएआयटी’ चाचणीतील गुणांवरून होईल.यासाठी इच्छुक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी झाल्यावर १ ते १५ सप्टेंबरदरम्यान जिल्हा, जात प्रवर्ग, विषयाचा प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर भरावे लागेल. त्यानंतर १० ऑक्टोबरला खासगी संस्थांना मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पोर्टलद्वारे दिली जाईल.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी निवडलेल्या उमेदवारांची पडताळणी ११ ते २१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. २१ ते २४ ऑक्टोबरदरम्यान निवड झालेल्या उमेदवाराचे समुपदेशन करून त्यांची नेमणूक होईल.

 

संबंधित पोस्ट

जम्मू-कश्मीर विधानसभेत आर्टिकल 370 पास होताच  नॅशनल कॉन्फरन्स चे नेत कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंद तर भाजपाने केला विरोध…

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील ३०३ जणांना समारंभपूर्वक नियुक्तीपत्र प्रदान,सरकारी नोकरी म्हणजे जनतेच्या सेवेची संधी- पालकमंत्री संजय शिरसाट

ओमिक्रॉनची भीती:कोरानाची तिसरी लाट नाशिकमध्ये जिनोम सिक्वेन्ससाठी 10 हजार नवीन किटची खरेदी, प्रशासन खडबडून जागे….

vishwatmaklokswamivarta

नवरात्री, दिवाळी आणि छट पूजा या सणांच्या काळात सर्वांना रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळणार, भारतीय रेल्वे 519 विशेष ट्रेन चालवणार…

vishwatmaklokswamivarta

शिवशक्ती आश्रम येथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागासह शहरी भागातील मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांवर भर – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

vishwatmaklokswamivarta