vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

मोरोक्कोत भूकंपाने हाहाकार माजवला. पहाटे ६.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के , अनेक इमारती कोसळल्या.  ६३२ जणांचा मृत्यू झाला बचाव कार्य सुरू

मोरोक्कोत भूकंपाने हाहाकार माजवला. पहाटे ६.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के , अनेक इमारती कोसळल्या.  ६३२ जणांचा मृत्यू झाला बचाव कार्य सुरू

 

विदेश प्रतिनिधी

मोरोक्को देश भूकंपाने हादरलं आहे. मोरोक्कोला ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. यात इमारती कोसळल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर, ६३२ जणांचा मृत्यू आणि अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शनिवारी पहाटेच्या सुमारास मोरोक्कोत भूकंपाने हाहाकार माजवला. पहाटे ६.८ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के मोरोक्कोत बसले. यानंतर मोरोक्कोत अनेक इमारती कोसळल्या. यामध्ये ६३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३२९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भूकंपानंतर प्रशासनाकडून बचावकार्यास सुरूवात करण्यात आली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या मारकेश शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, मारकेशपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

मोरोक्कोतील भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या प्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर पंतप्रधान मोदी म्हणाले, “मोरोक्कोतील भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. हे वृत्त ऐकून दु:ख झालं आहे. या दु:खद प्रसंगी माझ्या संवेदना मोरोक्कोतील लोकांबरोबर आहेत. या कठिण काळात मोरोक्काला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी भारत तयार आहे.”

संबंधित पोस्ट

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार; इम्रान यांच्यासह 4 जण जखमी

vishwatmaklokswamivarta

हे स्फोट केवळ दहशतवादी कृत्य नसून युद्धाची घोषणा म्हणून पाहिले पाहिजे, हिजबुल्ला प्रमुख नसराल्लाहची इस्रायलला धमकी,

vishwatmaklokswamivarta

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या इंजिनियर हरीश वर्धन सिंग यांनी या निवडणूकीत राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याची घोषणा

अफगाणिस्तान : दुसरे सर्वात मोठे शहर कंदाहार तालिबानच्या ताब्यात,वृत्तसंस्था एएनआय.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पिझ्झा डिलिव्हरी बॉयने जळत्या घरातून 5 जणांना वाचवले; पहा व्हिडीओ

यूएस, यूके आणि कॅनडा यांनी पाकिस्तानमधील नागरिकांसाठी जाहीर केली ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी