vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

चेंबूर येथे फुटबॉल च्या माध्यमातून लैंगिक समानता आणि आरोग्य स्वच्छता ह्या विषयावर जनजागृती 

चेंबूर येथे फुटबॉल च्या माध्यमातून लैंगिक समानता आणि आरोग्य स्वच्छता ह्या विषयावर जनजागृती

मुंबई प्रतिनिधी

चेंबूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय फक्त पार पडलेल्या चर्चासत्रात फुटबॉल खेळाच्या माध्यमातून लैंगिक समानता याचा संदेश देण्यात आला

पश्चिम भारत फुटबॉल संघ (विफा) या संस्थेच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल च्या माध्यमातून लैंगिक समानता आणि आरोग्य स्वच्छता ह्या विषयावर कार्यक्रम पार पडला.

नालंदा एज्युकेशनल फाउंडेशन (संचलित) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चेंबूर महाविद्यालयातील एन एस एस (राष्ट्रीय सेवा योजना) विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. फुटबॉल या खेळाच्या माध्यमातून सध्या लैंगिक समानता आणि आरोग्य स्वच्छता ह्या विषयावर कार्यक्रम पार पडत आहेत

त्या पैकी हा कार्यक्रम चेंबूर मध्ये घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पश्चिम भारत फुटबॉल संघाचे अध्यक्ष श्री. साउटर वाझ हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम शिवाजीनगर मधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये पार पडला. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे संस्थापक मा. श्री. चंद्रकांतजी हंडोरे साहेब (माजी सामाजिक न्यायमंत्री), संस्थेच्या विश्वस्त मा. सौ. संगीताताई हंडोरे, संस्थेच्या सचिव मा. सौ. सोनल शेंडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपीका फुलवाडीया मॅडम आणि सहा. प्रा. मदनलाल पाल सर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. निखिल गायकवाड. (चेंबूर)

संबंधित पोस्ट

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळांमधील खेळाडुंच्या विभागीय क्रीडा स्पर्धा…

vishwatmaklokswamivarta

टोकियो ऑलम्पिक, मध्ये 41 वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, जर्मनीला केले पराभूत.

vishwatmaklokswamivarta

खासगी क्रीडा अकादमींनी आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

आशिया कप मध्ये रवींद्र जडेजा ची मोठी कामगिरी…

vishwatmaklokswamivarta

विना अनुदानित खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धेसाठी एकविध संघटना पदाधिकाऱ्यांची आज बैठक