
विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या बैठकीचे 27 सप्टेंबर रोजी आयोजन…
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी :- शासन यंत्रणेतील भ्रष्टाचाराचे समूळ निर्मुलन करण्यासाठी शासन, सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक दि. ०४.०२.२०११ अन्वये विभागीय स्तरावरील भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारी/गाऱ्हाणी समितीकडून ऐकून घेण्यात येतात. तसेच लेखी स्वरुपातील तक्रारी स्विकारण्यात येतात. विशिष्ट अभिकथनाबाबत स्वतंत्र्यपणे स्थानिक चौकशी करण्याच्या दृष्टीने तजवीज करण्यात येते. भ्रष्टाचार कोणत्या क्षेत्रात ठिकाणी घडत आहे याबद्दल माहिती घेणे त्या क्षेत्रातील किंवा ठिकाणी
भ्रष्टाचार निर्मुलनासाठी उपाययोजना केल्या जातात. तसेच प्रशासकीय कार्यपध्दती नियम व इतर शासकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचारास वाव राहू नये व त्यांचे निर्मुलन व्हावे यादृष्टीने सुलभता व पारदर्शकता आणण्याबाबत शिफारस करण्यात येते. जेणे करून सामान्य जनतेच्या प्रशासकीय कार्यपध्दतीबद्दल साशंकता वाटणार नाही व जनतेची कामे सहजगत्या कशी होतील याबाबत समिती मार्फत सूचना देण्यात येतात.
विभागीय आयुक्त, औरंगाबाद तथा अध्यक्ष, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक २७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे.
विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे पुढील प्रमाणे शासकीय सदस्य आहेत. :- विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष, विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती, औरंगाबाद, पोलीस आयुक्त, औरंगाबाद, विशेष पोलीस महानिरिक्षक, औरंगाबाद, विशेष पोलीस महानिरिक्षक, नांदेड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड, मुख्य वन संरक्षक वनवृत्त, औरंगाबाद, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, औरंगाबाद, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद, विभागीय कृषि सहसंचालक, औरंगाबाद, विभागीय कृषि सहसंचालक, लातूर, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, औरंगाबाद १३. विभागीय सह निबंधक सहकारी संस्था, लातूरृ, उपायुक्त (महसूल) तथा सदस्य सचिव, विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती, औरंगाबाद.



