vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन..

राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन..

बुलडाणा, प्रतिनिधी: जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात यांनी हार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार संजिवनी मोपळे, नायब तहसीलदार संजय बंगाळे, स्वीय सहायक रविद्र लहाने, नाझर गजानन मोतेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात आज महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पंधरवडा – स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात आली. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी श्रीमती कुलकर्णी, वार्ड इन्चार्ज, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांचे समुपदेशक श्री सरकटे, सामाजिक कार्यकर्ता श्रीमती आराख, श्री. साबळे, घनश्याम बेडवाल आदी उपस्थित होते.
०००००

संबंधित पोस्ट

डेबुजी परिट समाज जालना आणि गुरू शिष्य परिवाराचा आगळा वेगळा उपक्रम–अमरधान स्मशाभूमीतील संत गाडगेबाबा शांतीवनाचे लोकार्पण @ संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर, मान्यवरांना पुरस्कार, स्वच्छतादुतांचा सत्कार

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागांचा आढावा

अनाथ बालकांच्या पालकत्वासाठी समाजाने पुढे यावे-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

श्री माता वैष्णोदेवी मंदिराच्या मार्गावरील भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला.

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा सतर्क· बालविवाहाची माहिती देण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा 112 डायल करा