
विनाअनुदानित खेळाच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी खेळांच्या पदाधिकाऱ्यांची 6 ऑक्टोबरला बैठक.
सांगली, प्रतिनिधी शासनाने सन 2023-24 च्या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी एकूण 90 खेळाच्या (अनुदानित व विनाअनुदानित) तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धेस मान्यता प्रदान केली आहे. विनाअनुदानित खेळाच्या शालेय क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संबंधित खेळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता सांगली हायस्कूल आमराई जवळ सांगली या ठिकाणी आयोजित केली आहे. या बैठकीस संबंधित खेळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.
जिल्हा संघटनेने पुढील विनाअनुदानित खेळांच्या स्पर्धेचे तांत्रीकदृष्ट्या यशस्वी आयोजन करावयाचे आहे. आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेग-सु-डो, फिल्ड आर्चरी, मॉटेक्सबॉल क्रिकेट, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअरबॉल, थायबॉक्सींग, हाफकिडो बॉक्सींग, रोप स्किपींग, सिलंबम, वूडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टींग, बीच व्हॉलीबॉल, टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, जित कुने दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेंन्टाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, चॉयक्वांदो, फुटबॉल टेनिस, बुडो, म्युजिकल चेअर, टेनिसबॉल क्रिकेट.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी (दूरध्वनी क्रमांक 0233-2990616) संपर्क साधावा.
00000



