vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

समृद्धी महामार्गावर जालना ते छत्रपती संभाजीनगर उच्चदाब वाहिनीचे काम पर्यायी वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिले वेळापत्रक.

समृद्धी महामार्गावर जालना ते छत्रपती संभाजीनगर उच्चदाब वाहिनीचे काम पर्यायी वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिले वेळापत्रक.

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक मंगळवार दि.10 ते गुरुवार दि.12 दरम्यान दुपारी 12 ते साडेतीन व दि.25 ते 26 दरम्यान दुपारी 12 ते 3 यावेळात बंद राहणार आहे,असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे.

 

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा दि.10 ते 12 (मंगळवार, बुधवार, गुरुवार असे तीनही दिवस) तर दुसरा टप्पा दि.25 व 26 (बुधवार व गुरुवार असे दोनही दिवस) असेल. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक दि.10 ते 12 दरम्यान (मंगळवार, बुधवार, गुरुवार असे तीनही दिवस) दुपारी 12 ते 3.30 वाजेपर्यंत तर दुसऱ्या टप्प्यात दि.25 ते 26 दरम्यान (बुधवार व गुरुवार असे दोनही दिवस) दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत बंद करण्यात येणार आहे. इतर कालावधीत या भागातील समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु असेल.

 

या कालावधीत पर्यायी वाहतुक मार्ग याप्रमाणे असेल, समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-14) ते सावंगी इंटरचेंज (IC-16) दरम्यान समृद्धी महामार्गवरुन नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक, निधोना (जालना) इंटरचेंज IC-14 मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग 753 A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल. तर समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल,असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता व प्रकल्प संचालक रामदास खलसे यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

विधान परिषद लक्षवेधी-सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत अंतिम अहवालानंतर दोषींवर कारवाई- गृह राज्यमंत्री पंकज भोयर

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षांच्या काळात जिल्ह्यात मनाई आदेश-परीक्षा केंद्रांभोवती 50 मीटर परिसरात निर्बंध; झेरॉक्स दुकाने बंद राहणार

vishwatmaklokswamivarta

आजपासून  महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन… सुरू झाले मात्र विरोधकांच्या मुद्द्यांमुळे दिवसभरासाठी तहकूब

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतन जनतेसाठी खुले करण्याच्या समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती

धर्मांतर केल्यानंतर कोणालाही हिंदू अनुसूचित जाती असल्याचा दावा करता येत नाही; केरळ हायकोर्टाने सीपीआय आमदाराला दणका

मुंबईकरांच्या प्रत्येक कार्यालयात नेऊन जेवणाचा डब्बा पोहोचवणाऱ्या त्या डबेवाल्यांना, डबेवाला भवनासाठी जागाच नाही…?

vishwatmaklokswamivarta