vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            राज्य प्रतिनिधी: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सांगलीच्या वतीने बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ई-टेंडरिंग, जेम पोर्टल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा उद्योग केंद्रातील सभागृहात होणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन एम सी ई डी कोल्हापूर अधिकारी सुदाम थोटे व प्रकल्प अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले आहे.

 

या कार्यशाळेचा प्रारंभ 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार असून उद्योजकांना व उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी चार दिवसीय ई-टेंडरिंग, जेम पोर्टल यावर ई-टेंडर गुरू हर्षद बर्गे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये ई-निविदा प्रक्रिया ओळख, ई-निविदा प्रक्रिया पद्धती, शासनाचे ई-टेंडरिंगचे मार्गदर्शक तत्त्वे, डिजिटल स्वाक्षरी म्हणजे काय, डिजिटल स्वाक्षरीसाठी अर्ज कसा करायचा, पीएसयु, सीपीएसयू आणि सरकारच्या आवश्यकतांचे मूल्यांकन कसे करावयाचे, कंपनी नोंदणी प्रक्रिया, दस्तऐवजीकरणाचे लाइव्ह प्रात्याक्षिक, त्यासोबत जेम पोर्टल, पोर्टलवर आपली फर्म कशी नोंदणी करावी, जेम पोर्टलवर प्रात्यक्षिक, जीएसटी आणि त्याचा परिचय, जीएसटी नोंदणी प्रक्रिया, एमएसएमई ग्लोबल मार्ट बद्दल माहिती तसेच नव उद्योजकासाठी विविध शासकीय योजना व त्यांची अंबलबजावणी बाबत माहिती देण्यात येणार आहे.

 

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी, सुशिक्षित बेरोजगार, उद्योजक, कंत्राटदार बनू इच्छिणारे, बचत गटातील सदस्य, महाविद्यालयीन युवक-युवती यांना सहभागी व्हावे. प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी 9579689412 / 7057994308 या नंबरवर अथवा महाराष्ट्र उद्योजकता विकास केद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, सांगली टाटा पेट्रोलपंपाच्या पाठीमागे उद्योग भवन येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. क्षीरसागर यांनी केले आहे.

 

00

संबंधित पोस्ट

नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात येईल  – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी २० हजार भाविकांची उपस्थित !**हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच !* – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था

प्रमुख स्वामी महाराजांची १०३ वी जयंती आणि BAPS चा ‘कार्यकार सुवर्ण महोत्सव’ दोन्ही साजरे,भगवान स्वामीनारायणापासून सुरू झालेल्या BAPS संस्थेने केवळ भक्तीवरच भर दिला नसून समाजसेवेची जोडही समाजात रुजवली-अमित शहा केंद्रीय गृहमंत्री

vishwatmaklokswamivarta

मुंबईकडे निघालेल्या इंडिगो विमानाच्या इंजिनात बिघाड, नौदलाच्या मदतीने प्रवाशांचा बचाव…

vishwatmaklokswamivarta

उत्तर प्रदेशात तुरुंगामध्ये असलेल्या. सपा नेते आजम खान, गँगस्टर ते आमदार असा प्रवास केलेले मुख्तार अन्सारी आणि अतिक अहमद यांच्याविरोधात चौकशीसाठी ईडीला परवानगी.

vishwatmaklokswamivarta