
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर; जिओ वर्ल्ड सेंटर येथे करणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राचे उद्घाटन..
मुंबई प्रतिनिधी
आता भारतात आणखी एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (OIC) 141 वे सत्र 15 ते 17 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे
14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आयओसी सत्राचे उद्घाटन होणार आहे. आयओसी सत्र हे ऑलिम्पिक खेळांबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे.
क्रीडा क्षेत्राशी संबंधित देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या सत्रात कतार, जॉर्डन, मोनॅको, लक्झेंबर्ग आणि भूतानचे राष्ट्रप्रमुख, ग्रेट ब्रिटन आणि लिक्टेंस्टीनच्या राजघराण्यातील सदस्य उपस्थित असतील. याशिवाय सात वेळा ऑलिम्पिक जलतरण पदक विजेता कर्स्टी कोव्हेंट्री, दोन वेळा ऑलिम्पिक पोल व्हॉल्ट सुवर्णपदक विजेता येलेना इसेनबायेवा, दोन वेळा ऑलिम्पिक 10,000 मीटर रौप्यपदक विजेते आणि केनियाच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष पॉल टेर्गट, ऑलिम्पिक पोल व्हॉल्ट सुवर्णपदक विजेता सर्गेई बुबका आणि ऑलिम्पिक नेमबाजी चॅम्पियन अभिनव बिंद्रादेखील सहभागी होतील



