vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानव्यवसाय

शेतकऱ्यांनी आंबा, काजू, व केळी या फळपिकांसाठी विमा योजना पोर्टल असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्री.अंकुश माने 

शेतकऱ्यांनी आंबा, काजू, व केळी या फळपिकांसाठी विमा योजना पोर्टल असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्री.अंकुश माने

 

ठाणे प्रतिनिधी- येत्या आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, याकरिता कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल सुरु झाले असून कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागांचे संरक्षण करा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्री.अंकुश माने यांनी केले आहे.

 

योजनेची वैशिष्टये –

· कोकण विभागामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडळात केळी, आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल. (आंबा, काजू – 5 वर्षे).

· कर्जदार शेतकरी व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक असेल.

 

· खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कूळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांनाही ही योजना लागू राहील.

 

· एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकांसाठी 4 हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येईल.

 

· विमा अर्जासोबत फळबागेचा Geo Tagging असलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील.

 

· एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच बहाराकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल.

 

· ही योजना ठाणे जिल्हामध्ये एचडीएफसी. एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत; पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. मार्फत व रायगड जिल्हामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी लि. मार्फत राबविण्यात येत आहे.

 

· फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी पिकाकरिता दि. ३१ ऑक्टोबर २०२३, काजू व आंबा पिकाकरिता दि. ३० नोव्हेंबर २०२३ आहे.

 

 

 

ठाणे जिल्ह्यासाठी विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (रु/हेक्टर):)

 

आंबा फळपिकासाठी विमासंरक्षित रक्कम – रु. 1 लाख 40 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – रु. 21 हजार 700. काजू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम – रु.1 लाख, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – रु. 5 हजार. केळी फळपिकासाठी विमासंरक्षित रक्कम – रु. 1 लाख 40 हजार, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा – रु.700.

 

 

 

फळपीकनिहाय हवामान धोके व संरक्षण कालावधी :

 

केळी फळपीक- समाविष्ट धोके- कमी तापमान, विमा संरक्षण कालावधी – दि.०१ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी. समाविष्ट धोके- वेगाचा वारा, विमा संरक्षण कालावधी – 01 मार्च ते 31 जुलै, समाविष्ट धोके- जास्त तापमान, विमा संरक्षण कालावधी – 1 एप्रिल ते ३० एप्रिल, समाविष्ट धोके- जास्त तापमान, विमा संरक्षण कालावधी – 1 मे ते 31 मे, समाविष्ट धोके- गारपीट (ऐच्छिक), विमा संरक्षण कालावधी – ०१ जानेवारी ते ३० एप्रिल.

 

काजू फळपीक -समाविष्ट धोके – अवेळी पाऊस, विमा संरक्षण कालावधी – 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी, समाविष्ट धोके- कमी तापमान, विमा संरक्षण कालावधी- 1डिसेंबर ते 28 फेब्रुवारी, समाविष्ट धोके- गारपीट, विमा संरक्षण कालावधी – 1 जानेवारी ते 30 एप्रिल.

 

 

 

आंबा फळपीक – समाविष्ट धोके – अवेळी पाऊस, विमा संरक्षण कालावधी – 01 डिसेंबर ते 31 मार्च, समाविष्ट धोके – अवेळी पाऊस, विमा संरक्षण कालावधी – 01 एप्रिल ते 15 मे, समाविष्ट धोके – कमी तापमान, विमा संरक्षण कालावधी – 1 जानेवारी ते 10 मार्च, समाविष्ट धोके – जास्त तापमान कमी तापमान, विमा संरक्षण कालावधी – 1मार्च ते 15 मे, समाविष्ट धोके – वेगाचा वारा, विमा संरक्षण कालावधी – 16 एप्रिल ते 15 मे, समाविष्ट धोके – गारपीट(एकच्छिक), विमा संरक्षण कालावधी – 01 फेब्रुवारी ते 31 मे.

 

 

 

वरील हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास ही योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रात नोंदल्या गेलेल्या हवामान तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई अदा करण्यात येईल.

 

 

 

अधिक माहितीकरिता शेतकऱ्यांनी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्री. अंकुश माने यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार व इंटर्नशिप मेळाव्याचे आयोजन…

जी. डी. सी. ॲन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षा 2024 चा निकाल घोषित*

vishwatmaklokswamivarta

नवीन बांधणी झालेल्या वाहनांची विक्रेत्यांमार्फत होणार नोंदणी

पर्यटन पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी; सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

समर्थनम ट्रस्ट फॉर दि डिसेबल संस्थेच्यावतीने दिव्यांग आणि गरजू युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

एका शेतकऱ्याचे निवेदन! कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची तत्परताअन् संपूर्ण देशात लागू झाली योजना!प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून फळ पिकांना स्वयंचलित ठिबक,प्रणालीसाठी मिळणार प्रति हेक्टरी 40 हजार रुपयांचे अनुदान

vishwatmaklokswamivarta