
मराठा आरक्षण जाहीर न झाल्यास मनोज जरांगे पाटील पुन्हा 25 ऑक्टोबरपासून उपोषणावर..
राज्य प्रतिनिधी
मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या मुदतीचं आता काऊंट डाऊन सुरू झालं आहे. येत्या दोन दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी आहे.
येत्या दोन दिवसामध्ये कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी आहे. त्यांची ही मागणी पूर्ण न झाल्यास 25 ऑक्टोबर पासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंतरावली सराटी गावामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती देताना आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खासदार, आमदारांना गावबंदी असेल
25 ऑक्टोबर पासून प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषण सुरू होईल आणि त्याचं रूपांतर 28 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणामध्ये होईल असे सांगण्यात आले आहे. प्रत्येक गावात मेणबत्ती फेरी देखील काढली जाईल. तसेच राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या होत आहेत. मराठा आरक्षणाचा हा लढा शांततेने होणार आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून कुणीही आत्महत्या करू नये असे आवाहनही त्यांनी तरूण मराठा समाजाला केलं आहे.



