vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा-कुणबी, कुणबी मराठा व कुणबी नोंदीचे जुने दस्तावेज असल्यास प्रशासनास उपलब्ध करून द्यावेत मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांचे आवाहन

मराठा-कुणबी, कुणबी मराठा व कुणबी नोंदीचे जुने दस्तावेज असल्यास प्रशासनास उपलब्ध करून द्यावेत मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांचे आवाहन

 

 

 

        राज्य प्रतिनिधी: मराठा समाजातील ज्या व्यक्तीकडे मराठा-कुणबी, कुणबी मराठा व कुणबी असल्याबाबत जुने दस्तावेज अथवा नोंदी असतील त्यांनी मिरज तहसील प्रशासनास संपर्क करून दस्तावेज उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून त्याची पडताळणी केल्यानंतर नियमानुसार कुणबी जातीचे प्रमाणपत्र संबंधितांना निर्गमित करण्याची कार्यवाही विनाविलंब करण्याच्या प्रक्रियेकामी प्रशासनास सहकार्य होईल, असे आवाहन मिरजेच्या तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी केले आहे.

 

मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक ते अनिवार्य पुरावे वंशावळी, शैक्षणिक पुरावे व महसुली पुरावे, इत्यादी दस्तावेज पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयाकडील असलेल्या नोंदणीची तपासणी करून त्यामध्ये कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्यास संबंधित पात्र लाभार्थ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्याबाबत शासन स्तरावरून निर्देश प्राप्त आहेत. त्यास अनुसरून तहसील कार्यालय मिरज कार्यालयामार्फत शासन निर्णयामधील कार्यपद्धतीनुसार मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याकरीता आवश्यक पुरावे शोधण्याच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर सर्व शासकीय विभागांच्या प्रमुखाची समिती गठीत करण्यात आलेली असून त्यामध्ये तालुका स्तरावरील 1) पोलीस विभाग 2) पंचायत समिती 3) उप अधीक्षक भूमी अभिलेख 4) वनक्षेत्रपाल 5) सह. दुय्यम निबंधक 6) उपनिबंधक सहकारी संस्था मिरज यासह तालुका स्तरावरील सर्व शासकीय विभागांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयाकडे सर्व उपलब्ध जुने दस्तावेज अथवा अभिलेख यांची तपासणी बाबत विशेष मोहीम राबवून मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जातीच्या नोंदी शोधणेचे कामकाज सुरू केले आहे.

 

तहसिल कार्यालय मिरज अंतर्गत अभिलेख कक्षातील उपलब्ध असलेल्या जुने सातबारे, फेरफार, खासरा पत्रक, इनाम पत्रक, जन्ममृत्यू रजिस्टर, कडई पत्रक, तसेच महसूल विभागाशी संबंधित इतर सर्व नोंदवह्या यामधील सर्व महसुली नोंदीची तपासणी करून त्यामध्ये मराठा-कुणबी, कुणबी-मराठा व कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याकामी विशेष प्रयत्न करण्यात येत असून या पथकामध्ये संबंधित गावचे मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांना अभिलेख तपासणी कामी नियुक्त केलेले आहे. तहसिल कार्यालय मिरज येथे उपलब्ध असलेल्या जुन्या अभिलेख ज्यामध्ये मोडी लिपी मध्ये नोंदी आहेत, अशा नोंदी तपासणी कामी संबंधित मोडी लिपी अभ्यासक (विशेषतज्ञ) यांच्यामार्फत नोंदी तपासणीची कार्यवाही सुरू असल्याचे डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

सेवा स्टॉल्सना उत्स्फूर्त प्रतिसाद भाविकांनी व्यक्त केले समाधान …

vishwatmaklokswamivarta

मतदार ओळख पटविण्यासाठी इपिकशिवाय-12 प्रकारची कागदपत्रे पुरावा म्हणून ठरणार ग्राह्य

vishwatmaklokswamivarta

राज्यात हापूसच्या खरेदी-विक्रीमध्ये होणार नाही फसवणूक..

पीक प्रात्याक्षिक घटकासाठी शेतकरी गटांनी पोर्टलवर अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

एसटी संपाबाबत मुंबई उच्च न्यायलयाचे राज्य सरकारला हे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

सरकार ऑनलाइन गेमिंग नियम २०२५ च्या प्रचार आणि नियमावलीवर नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. याबाबतची माहिती