
भारत ऑस्ट्रेलिया सामना: क्रिकेट वीर विराट कोहलीने फायनलमध्ये झळकावले अर्धशतक, राहुलसोबत 50 हून अधिक धावांची केली भागीदारी….
क्रिकेट प्रतिनिधी
20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरेल. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर हे तिसरे विजेतेपद असेल. त्याचबरोबर सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील अंतिम सामना नरेंद्र स्टेडियम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. हे दोन्ही संघ 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडणार आहेत. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरेल. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर हे तिसरे विजेतेपद असेल. त्याचबरोबर सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत अवघ्या 56 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाचा स्कोर 142/3 आहे.



