vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी,1 डिसेंबर रोजीच्या मोटार सायकल रॅलीनिमित्त वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी,1 डिसेंबर रोजीच्या मोटार सायकल रॅलीनिमित्त वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली

 

 

 

राज्य प्रतिनिधी :- सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना शहरातील पांजरपोळ मैदान येथे दि.1 डिसेंबर 2023 रोजी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या अनुषंगाने सकल मराठा समाजाचे नागरीक छत्रपती संभाजी महाराज पुतळा या ठिकाणी एकत्र येवून मोटार सायकल रॅली काढणार आहेत. तरी या मोटार सायकल रॅलीमध्ये अडथळा निर्माण होऊ नये, रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात वाहनांमुळे अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि वाहतुकीचे नियमन व नियंत्रण होणे गरजेचे आहे. तरी याकरिता खालील मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे, असे आदेश पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी जारी केले आहेत.

 

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरातील वाहतुक खालील नमुद पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगरकडुन जालना मोतीबाग बायपास रोडने अंबड, घनसावंगी व मंठा कडे जाणारी वाहतुक ही ग्रेडर टी पॉईन्ट, बायपास रोड, कन्हैया नगर, नाव्हा चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. (मोटार सायकल रॅली छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासुन समोर गेल्यावर ग्रेडर टी पॉईन्ट पासुन बायपास रोड, कन्हैया नगर, नाव्हा चौफुली, मार्ग नाव्हा मंठा, अंबड चौफुलीकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येऊन ती वाहतुक पुर्ववत सिटीझन टी पॉईन्ट, मोतीबाग मार्गे अंबड – मंठा, नाव्हा – देऊळगावराजा कडे जाईल व येईल.) नुतन वसाहत, शनि मंदीर, मार्ग नवीन जालना शहरात जाणारी वाहतुक ही अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. रेल्वे स्टेशन कडुन गांधी चमन, मंमादेवी मार्गे नवीन जालना शहरात जाणारी वाहतुक ही अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल.

 

गणपती गल्ली, दिपक हॉस्पिटल, माळीपुराकडुन येणारी व गांधी चमन मार्गे नवीन जालना शहरात जाणारी वाहतुक ही मोटार सायकल रॅली पुढे जाई पर्यंत थांबविण्यात येईल व मोटार सायकल रॅली पुढे गेल्यावर शनि मंदीर किंवा रेल्वे स्टेशन मार्गे अंबड चौफुली, मंठा चौफुली मार्गे जाईल व येईल. बसस्थानक, सिंधी बाजार, सदर बाजार, बडी सडक परीसरातुन येणारी व जुना जालना शहरात जाणारी वाहतुक ही जिजामाता प्रवेशद्वार, मंठा चौफुली, अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल व येईल. मंगळ बाजार, गोल मस्जिद, चमडा बाजार, पंचमुखी महादेव मंदिर या परिसरातील वाहतुक सुभाष चौक मार्गे जुना जालना शहरात जाणारी वाहतुक ही राजमहेल टॉकीज समोरील पुलावरुन,ग्लोबल गुरुकुल शाळा, बायपास रोड, अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल व येईल. संभाजीनगर भागातून बसस्थानक मार्गे सदर बाजार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मंठा चौफुलीकडे जाणारी वाहतुक ही गोल्डन जुब्ली स्कुल, संतोषी माता रोड, विवेकानंद हॉस्पिटल, जिजामाता प्रवेशद्वार मार्गे जाईल व येईल. सिटीजन पॉईन्ट, दुःखी नगर, रामतिर्थ भागातून बसस्थानक मार्गे शहरात येणारी वाहतुक ही भोकरदन नाका येथे मोटार सायकल रॅली नवीन मोंढा रोडकडे पास होईपर्यंत थांबविण्यात येईल व नंतर पुर्ववत भोकरदन नाका बसस्थानक मार्गे वाहतुक सुरु करण्यात येईल. आदेश दि. 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजेपासून मोटार सायकल रॅली संपेपर्यत अंमलात राहील. जालना जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी या अधिसुचनेची प्रत चिटकावी. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

एससी, एसटीवरील अन्याय खपवून घेणार नाही सतीश पवार यांचा इशारा : भीम आर्मीची जिल्हा कचेरीसमोर निदर्शने : आरक्षण वर्गीकरणाचा अन्यायकारक निर्णय रद्द करा

महाराष्ट्र एसटीच्या संपाने खासगी ट्रॅव्हल्स ‘गब्बर’ नागरिकांची उडाली तारांबळ कधी सुटणार प्रश्न?

vishwatmaklokswamivarta

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ उपक्रमात सहभागी व्हा!२२ एप्रिल ते १ मे २०२५ या कालावधीत राज्यात विविध उपक्रम साजरे होणार – पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे

अनधिकृत बांधकामांवर  मुंबई पालिकेने  युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, अनधिकृत बांधकामाबाबत मुख्यमंत्र्यांचा BMC ला महत्त्वाचा आदेश.

vishwatmaklokswamivarta

अयोध्येत दारूबंदीची केलेली मागणी मान्य करणार्‍या योगी सरकारचे अभिनंदन !अयोध्येप्रमाणेच काशी-मथुरेसह अन्य सर्वच तीर्थक्षेत्री मद्य-मांस बंदी करा ! – हिंदु जनजागृती समिती 

vishwatmaklokswamivarta

आपल्या मुली गायब होतात, फ्रीज, कपाटात सापडतात; यशश्रीला न्याय द्या… अभिनेत्री केतकी चितळे